शिक्षकच बनला भक्षक! चौथीतल्या चिमुरडीवर अत्याचार; अहिल्यानगर हादरलं, आरोपी मोकाट…

Teacher Physically Abuses Fourth Year Student In Parthadi : पाथर्डी तालुक्यातून (Ahilyanagar Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस (Crime News) आला. त्यानंतर पाथर्डी तालुक्यात मोठी खळबळ उडाली (Teacher Physically Abuses Student)आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गावातील सरपंच असलेल्या पत्नीच्या पतीने हस्तक्षेपातून आर्थिक तडजोड करून प्रकार दडपल्याची माहिती समोर येत आहे.
…तर स्पॉन्सरशीपसाठी रॅपिडोचं ब्लॅकमेलिंग सुरू होत; रोहित पवारांच्या निशाण्यावर प्रताप सरनाईक
नागरिकांमध्ये संतापाची भावना
जिल्हा परिषद शाळेत (Parthadi) शिकणारी विद्यार्थिनी ही परप्रांतीय असल्याची माहिती पुढे येत आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांना काही आर्थिक मदत देऊन हा प्रकार मिटवण्यात आल्याची चर्चा गावात सुरू असून, सरपंचपतीच्या भूमिकेबाबतही नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
VIDEO : निर्णय घेण्यासाठी ठाकरे बंधू सक्षम! उद्धव ठाकरे दिल्लीतून कडाडले, शिंदेंवर घणाघात…
अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा
पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने ‘पॉक्सो कायद्या’अंतर्गत हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मात्र अजूनही संबंधित शिक्षकाविरोधात कोणतीही तक्रार दाखल नाही.या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस कारवाई झालेली नसून, स्थानिक पातळीवर दबाव आणि मध्यस्थीमुळे सत्य दडवले जात असल्याचा आरोप काही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
प्रकरण दडपलं जातंय?
पीडितेला न्याय मिळावा, आणि आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. स्थानिक प्रशासन आणि महिला बालकल्याण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, तसेच पोलिसांनी त्वरित चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी दबक्या आवाजात सुरू आहे.