आदित्य ठाकरे स्वत: ड्रग्ज विकतो, नितेश राणेंचा खळबळजनक दावा

Nitesh Rane claim On Aditya Thackeray : दिशा सालियन हत्या प्रकरणात ( Disha Salian Case) दिवसेंदिवस आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. पुन्हा एकदा भाजप नेते नितेश राणे यांनी (Nitesh Rane) याप्रकरणी खळबळजनक दावा केलाय. दिशाच्या वकिलांकडे आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) ड्रग्ससाठीचे चॅट असल्याचं नितेश राणेंनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा वातावरण तापणार, असं दिसतंय.
नितेश राणे (BJP) म्हणाले की, दिशा सालियानचं डिसेंबरमध्ये लग्न होणार होतं. तरुण मुलीला गमवलेल्या वडिलांनी आरोप केले असतील, तर हा राजकिय मुद्दा होऊ शकत नाही. मुलीचे वडिल बोलत असतील तर राजकिय मुद्दा कसा? तिचे वडिल सरकारकडे आले नाही, तर कोर्टात गेले आहेत. नैतिकता आणि ठाकरे कुटुंब याचा काही संबध येत नाही. राजीनामा देताना सर्व पदाचा मी देत असल्याचं म्हणतात आणि नंतर इथे बेशरमसारखे बसतात, अशी देखील टीका नितेश राणे यांनी केलीय.
‘मविआ’चा रिव्हर्स गिअर; राम शिंदेंविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव घेतला मागे, कारण काय?
दिशा सालियानच्या वकिलांकडे रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे ड्रग्जचे चॅट आहे, असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केलाय. ते न्यायालयात आल्यावर दूध का दूध, पाणी का पाणी होईल, त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यानी काही केलं नाही. 70 दिवस सीबीआयला येऊ दिलं नाही, असा देखील आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.
ड्रग्ज कनेक्शनमध्ये UBT कनेक्शन म्हणजे आश्चर्य काय? असं देखील नितेश राणे यांनी विचारलं. आदित्य ठाकरे स्वत: ड्रग्ज विकतो. जसा मालक, तसा खासदार असा देखील टोला राणेंनी लगावला आहे. यासोबतच त्यांनी म्हटलंय की, हिंदू समाजाची बाजू घेणं, कोणाची माथी भडकवणं हे चुकीचं आहे. हिंदूंच्या सणावेळी पाकिस्तानचे झेंडे दाखवतात, या सर्वांचे समर्थन तक्रार करणारे करतात का? असं देखील नितेश राणे यांनी विचारलंय.
Video : देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराड सागंल ते घुलेनी.. कोर्टात काय घडलं? निकम काय म्हणाले?
माझ्या भूमिकवर आक्षेप असेल, तर खुल्या मंचावर या असं देखील आव्हान नितेश राणे यांनी विरोधकांना दिलंय. मोदींना पत्र लिहिण्यापेक्षा माझ्याकडे या, चर्चा करा असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानला विरोध करतात, ज्या जिहाद्यांना ते विरोध करतात त्यांना आमचा विरोध नाही. राष्ट्रप्रेमी मुसलमाना विरोधात आम्ही कालही नव्हतो. आजही नाही, असं देखील नितेश राणे यांनी म्हटलंय.