Video : …तर नेपाळपेक्षा भयानक परिस्थिती होणार, ज्येष्ठ पत्रकार वागळे संतापले, पहा वादळी मुलाखत

पहिल्यांदाच शिक्षणाचा मुद्दा आला, राम मंदिल, हिंदु, मुस्लिम हा मुद्दा नाही. 21 मुलांनी आत्महत्या केली तरी हे लोकांना लाज नाही असा घणाघात वागळे यांनी केलाय.

News Photo   2026 07 24T145037.093

Video : ...तर नेपाळपेक्षा भयानक परिस्थिती होणार, ज्येष्ठ पत्रकार वागळे संतापले, पहा वादळी मुलाखत

दिल्लीत लोकसभेवर विद्यार्थ्यांनी जो मोर्चा (Delhi) काढला त्यातील सगळा गोंधळ आणि कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती निर्माण झाली ती विद्यार्थ्यांमुळं नाही तर पोलिसांनी ते ठरवून केलं. दगडफेक करणारे, गोंधळ करणारे, दंगा करणारे जे लोक होते ते विद्यार्थी नव्हते तर ते पोलिसांनी जमा केलेले लोक होते. त्यामुळं विद्यार्थ्यांवर हिंसाचाराचा आरोप न करता तो आरोप पोलिसांवर केला पाहिजे असं स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी मांडलं. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

यावेळी वागळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. फडणवीस यांना लाज वाटत नाही या विद्यार्थ्यांना देशद्रोही असं काही म्हणायला? हे निर्लज्य लोक आहेत असंही ते म्हणाले. त्याचबरोबर आजपर्यंतची सर्व क्रांती ही तरुणांनीच केली आहे. त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने यामध्ये सहभाग घेतला नाही असं मला वाटलं पण पुढे राहुल गांधी यांनी स्वत: आंदोलन केलं. त्यामुळं उशिरा आले पण ते आज रस्त्यावर आले आहेत हे महत्वाचं आहे असंही वागळे यावेळी म्हणाले आहेत.

Raj Thackeray : मला एक प्रश्न पडला आहे;भली मोठी पोस्ट करत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान, जर विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर नेपाळपेक्षा भयानक परिस्थिती होऊ शकते असा मोठा दावा वागळे यांनी केला आहे. आज मुंबईत जमावबंदी लागू केली आहे हे काय यांच्या बापाचं राज्य आहे का असंही वागळे यांनी म्हणाले आहेत. त्याचबरोबर या आंदोलनाचा परिणाम फक्त भारतात नाही तर देशाबाहेरही याचे पडसाद उमटले आहेत. जगात मोदी यांची मोठी बदनामी झाली आहे असंही ते म्हणाले.

ही माणसं नाहीत ही जनावरं आहेत असं म्हणत वागळे यांनी मोदी शहा यांच्यावर घणाघात केला आहे. 2014, 2019 ला हे लोकांनी निवडून दिलं. पण हे 2024 ला सगळे आयुध वापरून निवडून आले आहेत. पण, ज्या ज्यावेळी एखादा हुकुमशाही पद्धतीने काम करतो तेव्हा जनता रस्त्यावर उतरते. तेव्हा हे सगळं उलथून पडतं. त्यामुळं हे एकदा जाणार असंही वागळे म्हणाले. आज माणसं जागे झाले आहेत. रीक्षावाले म्हणतायेत आता मोदीजी गेले पाहिजेत इतके लोक वैतागलेत असंही वागळे यांनी यावेळी त्यांना दावा केला.

पहिल्यांदाच शिक्षणाचा मुद्दा आला, राम मंदिल, हिंदु, मुस्लिम हा मुद्दा नाही. 21 मुलांनी आत्महत्या केली. तुमची आमची मुलं आहे ती. जरी लोकांनी आजपर्यंत मतदान केलं असलं तरी आता नाही करणार हे लक्षात घेतलं पाहिजे. जब जब मोदी डरता है पोलीस को आगे करता है अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. परंतु, अनेक माध्यम गोदी माध्यमं झाले आहेत असा आरोपही वागळे यांनी केला. कारण पत्रकारांनी लोकांच्या प्रश्नांशी प्रामाणिक असलं पाहिजे असंही वागळे म्हणाले आहेत.

Exit mobile version