भाजपचं काम अपूर्णच, पूर्ण करा नाहीतर मला बोलवा; वागळे प्रकरणी राणेंच्या खुलेआम सूचना

भाजपचं काम अपूर्णच, पूर्ण करा नाहीतर मला बोलवा; वागळे प्रकरणी राणेंच्या खुलेआम सूचना

Nitesh Rane On Nikhil Wagale : निखिल वागळे (Nikhil Wagale) स्वस्तात वापस गेलायं, पुणे भाजपचं काम अपूर्णच, ते पूर्ण नाहीतर मला बोलवा, या शब्दांत भाजपचे आमदार आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कार्यकर्त्यांना खुलेआम सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पुण्यातील आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी नितेश राणेंनी विविध मुद्द्यावर थेट भाष्य केलं आहे.

भाजपमध्ये सर्व भाडोत्री, काही दिवसांनी त्यांचा अध्यक्षही कॉंग्रेसमधून आलेला असेल; ठाकरेंचे टीकास्त्र

पुण्यात निर्भय बनो सभेसाठी आलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच निखिल वागळे आणि असीम सरोदे निर्भय बनो कार्यक्रमासाठी पुण्यातून जात असताना त्यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. त्यानंतर हे प्रकरण चांगलच चिघळल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यावरच बोलताना आज नितेश राणेंनी कार्यकर्त्यांनी थेट मला बोलावण्याचं आवाहन केलं आहे.

Devendra Fadanvis : आगे आगे देखो होता है क्या, चव्हाणांच्या भाजप प्रवेशादरम्यान फडणवीसांचं सूचक वक्तव्य

पुढे बोलताना ते म्हणाले, निखिल वागळे हा कुठलाही पत्रकार नाही, त्याला पत्रकार म्हणून तुम्ही स्वतःचा अपमान करून घेऊ नका ती विकृती आहे. तुम्ही पत्रकारांचा अपमान करू नका, निखिल वागळे फार स्वस्तात वापस गेला आहे. पुणे भाजपाचे काम अपूर्ण राहिलं आहे, ते काम पूर्ण करा नाहीतर मला बोलून घ्या आपण करू, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर 9 फेब्रुवारी रोजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. असीम सरोदे यांच्या घरापासून ‘निर्भय बनो’ सभेला येत असताना डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात आक्रमक भाजपच्या कार्यकर्त्यांनी वागळे यांची गाडी फोडली. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांच्यावर शाईफेक आणि अंडीही फेकण्यात आली.

उद्धव ठाकरे 2024 नंतर ऑर्थर जेलमध्ये खडी फोडणार
उद्धव ठाकरेंना आमचं सांगणं आहे की तू 2024 ओलांडून बघ. आम्ही लोकसभा निवडणुकीत 400 जागा ओलांडणार आहोत. 2024 नंतर तू मातोश्रीमध्ये राहतो की आर्थर रोड जेलमध्ये खडी फोडायला जातो ते बघू. आमची चिंता करण्याऐवजी स्वतःची आणि स्वतःच्या मुलाची चिंता कर, असा खोचक सल्लाही नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

महाविकास आघाडीचं भावपूर्ण श्रद्धांजली झालं आहे. संजय राऊत जिथे जिथे जातील तिथे तिथे अशीच वाट लावतील. आधी शिवसेना आता राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस देखील तो संपवणार आहे. संजय राऊत यांनी न्हावीचा धंदा कधी सुरू केला मला माहिती नाही, आत्तापर्यंत तो सिल्वर ओकचा चपराशी होता, अशी टीका नितेश राणेंनी संजय राऊतांवर केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज