विकासाची गंगा आपल्या दारात आणणाऱ्यांना साथ द्या; संभाजी पाटील निलंगेकरांच आशीर्वाद यात्रेतून आवाहन

विरोधक महायुतीने काय केले ? असे विचारत आहेत. मतदारसंघात विकास झाला नसल्याचा अपप्रचार ते करत आहेत. परंतु सत्ता असताना

विकासाची गंगा आपल्या दारात आणणाऱ्यांना साथ द्या; संभाजी पाटील निलंगेकरांच आशीर्वाद यात्रेतून आवाहन

विकासाची गंगा आपल्या दारात आणणाऱ्यांना साथ द्या; संभाजी पाटील निलंगेकरांच आशीर्वाद यात्रेतून आवाहन

Sambhaji Patil Nilangekar : निलंगा विधानसभा मतदारसंघात यावेळेस काका पुतण्याची लढत दिसणार नाही. अशोक पाटील निलंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक रिंगणातून त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांच्यामध्ये लढत होणार आहे.  संध्या निलंगेकर यांनी आशीर्वाद यात्रा काढलेली आहे. काल त्यांची यात्रा शेंद उत्तरला पोहोचली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात निलंगेकर यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.

विरोधक महायुतीने काय केले ? असे विचारत आहेत. मतदारसंघात विकास झाला नसल्याचा अपप्रचार ते करत आहेत. परंतु सत्ता असताना त्यांनी कोणती विकासकामे केली ? हे विचारण्याची वेळ आता आलेली आहे. विरोधकांनी जनहिताची कामे केली नाहीत. त्यांच्याकडे नियोजन नाही. विकासाची परिभाषा या मंडळींना ठाऊक नाही असा थेट घणाघात निलंगेकर यांनी यावेळी बोलताना केला.

धनगर आरक्षणासाठी निलंगेकरांनी विधानसभेतही उठवला होता आवाज; महायुतीचं सरकार आल्यावर प्रश्न सोडवण्याचं आश्वासन

विरोधकांचे स्वतःचे कर्तृत्व नाही. लोकांसाठी तळमळ नाही. असे लोक केवळ अपप्रचाराचा आधार घेत आहेत. या निवडणुकीत विकासाची गंगा आपल्या दारात आणणाऱ्यांना साथ द्यायची की अपप्रचार करणाऱ्यांच्या सोबत जायचे ? याचा निर्णय आपणास करावयाचा आहे, असंही निलंगेकर यावेळी म्हणाले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मंगेशजी पाटील, माजी सभापती गोविंदजी चिलकुरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वरजी पाटील, ऋषिकेशजी बद्दे, सरचिटणीस माधवरावजी बिरादार, विधानसभा प्रभारी दगडूजी साळुंके, माजी सभापती धोंडीराम सांगवे, उमाकांतजी देवंग्रे, शहराध्यक्ष संतोषजी शेटे, ज्ञानेश्वरजी चेवले, राजकुमारजी शिंदाळकर, नारायणजी माने, अजीमजी मुल्ला आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version