Download App

संभाजी पाटील निलंगेकरांच्या प्रचारात प्रचंड गर्दी; आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून डोर टू डोर संवाद

निलंगा मतदारसंघ आज विकासाच्या अनेक पायऱ्या चढत आहे. पण काही लोकांना हा विकास बघवत नसल्याने ते पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • Written By: Last Updated:

Sambhaji Patil Nilangekar Ashirwad Yatra : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय. दरम्यान, निलंग्याचे महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर हे आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जोरदार प्रचाराला लागले आहेत. (Ashirwad Yatra) ते होसूर दौऱ्यावर असताना त्यांना उदंड प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसाची अंतिम बैठक होसूर येथे संपन्न झाली. निलंगा मतदारसंघाच्या विकासाचा लेखाजोख सर्वांच्या पुढे मांडत संभाजी पाटील यांनी आगामी निवडणुकीत भाजपा-महायुतीलाच निवडून देण्याची विनंती सर्वांना केली.

निलंगा मतदारसंघ आज विकासाच्या अनेक पायऱ्या चढत आहे. पण काही लोकांना हा विकास बघवत नसल्याने ते पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना विकासाशी आणि नागरिकांच्या हिताशी देणेघेणे नाही. त्यांना फक्त स्वतःचे हित साधायचे आहे. त्यामुळे अशा स्वार्थी लोकांपासून मतदारसंघाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे असंही संभाजी पाटील निलंगेकर यावेळी म्हणाले. तसंच, २० तारखेला लोककल्याणाची भूमिका घेऊन काम करणारे आपले भाजपा-महायुती सरकारच निवडून द्या, असे आवाहन सर्वांनी केले.

संभाजीराव पाटील निलंगेकरांचे हात बळकट, काँग्रेसच्या गोविंद शिंगाडेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

यावेळी जिल्हा सरचिटणीस संजयजी दोरवे, निलंगा तालुकाध्यक्ष कुमोदजी लोभे, औराद बाजार समितीचे सभापती नरसिंगजी बिरादार, औराद बाजार समितीचे उपसभापती शाहूराजजी थेटे, निलंगा विधानसभा प्रभारी दगडूजी सोळंके, शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुधीरजी पाटील, आठवले गटाचे उपजिल्हाप्रमुख अंकुशजी ढेरे, निलंगा बाजार समितीचे संचालक अरविंदजी पाटील जाजनुरकर, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस हसनजी चाऊस, राष्ट्रवादी शहराध्यक्ष धम्मानंदजी काळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, आशीर्वाद यात्रेअंतर्गत हंचनाळ येथे संवाद बैठक संपन्न झाली. गावकऱ्यांच्या उत्साहपूर्ण स्वागताचा स्वीकार करून निलंगा मतदारसंघाच्या विकासाचा लेखाजोखा त्यांच्या समोर मांडला. महायुती सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देताना मतदारसंघात त्याचे सर्वाधिक लाभार्थी असून महिला, शेतकरी, युवक व गोरगरीब जनतेला प्राधान्य देऊनच सरकार काम करत असल्याचं निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं. तसेच यंदाची निवडणूक ही आपल्या सर्वांसाठी निर्णायक असून नुसता मतदारसंघ नाही तर संपूर्ण राज्याच्या भविष्याचा विचार करून त्ये २० तारखेला भाजपा महायुतीला कमळाचे बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

follow us