Download App

पहिले नकार मग सतेज पाटलांसमोर सुनावणी; निलेश चव्हाण शस्त्रपरवान्यात मोठी अपडेट समोर…

Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. तर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली.

Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagawane Case) अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. तर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणाती आरोपी निलेश चव्हाणवर (Nilesh Chavan) बलात्कार सारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती पिस्तुलचा परवाना देण्यासाठी गृह विभागाकडे झालेल्या सुनावणीदरम्यान तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांपासून लपवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, निलेश चव्हाणला पिस्तुलचा परवाना देण्याचा अर्ज पुणे पोलिसांनी (Pune Police) नाकारला होता मात्र मंत्र्यांच्या सुनावणीनंतर हा अर्ज स्वीकारण्यात आला आणि निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळाला. या प्रकरणात सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, निलेश चव्हाणने पिस्तुल परवाना मिळावा यासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला होता मात्र पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव निलेशचा अर्ज फेटाळला. यानंतर त्याने गृह विभागात अर्ज केला आणि या प्रकरणात तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्याकडे सुनावणी झाली आणि निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्याचा निर्णय झाला. या निर्णयानंतर गृह विभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मंजूर केला.

तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुनावणी सुरु असताना निलेश चव्हाणवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि इतर गंभीर कलमांअतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली नाही. त्यामुळे आता पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच शस्त्र परवाना मिळावा यासाठी निलेश राजकीय क्षेत्रातील ओळख वापरली असल्याची देखील समोर आली आहे.

‘जेलमध्ये आरोपींकडे 300 कोटी रूपये मागितले’, हगवणे प्रकरणातील सुपेकरांबाबत आमदार धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाण मुख्य आरोपीपैकी एक आहे. या प्रकरणात तो 22 मेपासून फरार होता. अखेर त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 30 मे रोजी नेपाळमधून अटक करत विमानाने पुण्यात आणले. तर दुसरीकडे या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी वैष्णवी हगवणेचा पती शशांक, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. सासरच्या छळाला कंटाळून 23  वर्षीय वैष्णवीने आत्महत्या केली होती.

follow us