Nilesh Rane : माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane ) यांनी ठाकरे पिता-पुत्रावर जोरदार टीका केली. राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे स्वतः ला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणतात. पण त्यांचं सगळं कुटुंब हे शिंदेंसोबत आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनीच दिशा सालियानला मारले असा आरोप देखील यावेळी राणे यांनी केला. ते गुहागरमध्ये सभा झाली त्यावेळी बोलत होते.
फारूख अब्दुल्लांना कलम 370 हटवल्यानंतरही भाजपसोबत जायचं होतं, मोठ्या नेत्याचा दावा
निलेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणतात की, ठाकरे कुटुंबासारखं कुटुंब कुठेही नाही. मात्र त्यांच्याच कुटुंबातील त्यांचे सख्खे भाऊ जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे तसेच कुटुंबातील जवळचे सदस्य असलेले थापा ही सर्व मंडळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मग कुठे आहे तुमचं कुटुंब? जे ठाकरे स्वतःला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणतात. पण हे कसले कुटुंबप्रमुख यांचे कुटुंब दुसरीकडे आहे.
Nilesh Rane : ताफ्यावरील दगडफेकीनंतर राणेंची जीभ घसरली; जाधवांवर खालच्या भाषेत जोरदार हल्लाबोल
तसेच जयदेव ठाकरे हे संपत्तीच्या वादामध्ये कोर्टात केले होते. त्यावेळी ठाकरे कुटुंबातील अनेक गोष्टी समोर येत होत्या. मात्र त्यानंतर कॅमेरा आणि माध्यमांसमोर सुनावण्या बंद करण्यात आल्या. कारण ठाकरे कुटुंबामध्ये कोण कोणाला जन्माला घालतो हे कळत नाही. भास्कर जाधव हे आमच्या कुटुंबावर बोलतात. त्यावेळी उद्धव ठाकरे हे हसत होते. ठाकरे जर संस्कृत असते तर त्यांनी जाधवांना भाषा सुधारायला सांगितले असते.
तसेच यावेळी राणे यांनी आदित्य ठाकरेंवर देखील टीका केली. कुठलाही अनुभव नसताना आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते. दिशा सालियान प्रकरणात त्यांचाच हात आहे. त्यांनीच तीला मारले आहे. मात्र त्या मुलीचे आई वडील मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध तक्रार करू शकले नाही. त्यामुळे हे प्रकरण पुढे येत नाहीये. असं राणे म्हणाले.