Nilesh Rane : ताफ्यावरील दगडफेकीनंतर राणेंची जीभ घसरली; जाधवांवर खालच्या भाषेत जोरदार हल्लाबोल
Nilesh Rane : माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane ) यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. ते म्हणाले की, भास्कर जाधव हा डान्स बारची अवलाद आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे त्यांना आयटम गर्ल म्हणून सगळीकडे घेऊन फिरवतो. ते निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा झाली त्यावेळी बोलत होते.
जरांगे पाटलांची औषधे-ज्यूस तपासून द्या; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला घातपाताचा संशय
निलेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव हा डान्स बारची अवलाद आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे त्यांना आयटम गर्ल म्हणून सगळीकडे घेऊन फिरवतो. सगळीकडे 18 महिने गरोदर असलेला भास्कर नाचतोय कसा बघा? काय तुझं शरीर काय तुझे थोबाड. गुहागर मतदारसंघाचे नाव महाराष्ट्राचे नकाशावर नेणारे आमदार कुठे आणि हा कुठे? तसेच गुहागरमध्ये पाच कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते भास्कर जाधव आणि त्यांची मुलं त्यात एकच त्यांच्यासारखा दिसतो बाकीचे तर दिसत पण नाही. त्यांचे वाईन शॉप आहेत. ते काय रोजगार देणार. यांच्या बंगल्याकडे जाणारे रस्ते कसे आहेत आणि ग्रामीण भागातील रस्ते कसे आहेत बघा. अशा प्रकरे खालच्या भाषेत बोलत राणे यांनी भास्कर जाधवांवर जोरदार निशाणा साधला आहे.
दिल्लीतील आंदोलनाचा योगींना धसका ! राज्यात सहा महिन्यांसाठी संपावर बंदी
तसेच राणे पुढे म्हणाले की, आमच्या शेपटावर पाय दिला आहे. मी या जन्मात ही गोष्ट विसरणार नाही. मी आता तुला सोडणार नाही. ते सभा घेतील तिकडे मी सभा घेईल. पण तू राहिलास तर पुढची सभा होईल. असा गर्भित इशारा देखील यावेळी राणे यांनी दिला. तसेच राणे साहेबांबद्दल वाकडे तिकडे बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. असं ही राणे म्हणाले.
नरेंद्र मोदी लबाडांचे सरदार, 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल
निलेश राणे गुहागरमध्ये सभा झाली. त्या अगोदरच गुहागरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून जात असताना निलेश राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून हा जमाव हटवण्याचा प्रयत्न केला.
निलेश राणे यांची आज सायंकाळी भास्कर जाधव यांचा मतदारसंघ असलेल्या गुहागरमधील तळी या ठिकाणी सभा झाली. तर गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव आणि राणे पिता पुत्र हे एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसून येत आहेत. त्याच दरम्यान निलेश राणे हे जाधव यांना उत्तर देण्यासाठी या सभेचे आयोजन करत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र त्या अगोदरच राणे आणि जाधव यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळालं.