Download App

लव्ह जिहाद खोटं, असं काही नसतं, अबू आझमींचं चॅलेंज नितेश राणेंनी स्वीकारलं

मुंबई : लव्ह जिहाद खोटं आहे असं काही नसतं, आमदार अबू आझमी यांचं चॅलेंज आमदार नितेश राणेंनी स्वीकारलं आहे. दरम्यान, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणावरुन राणे-आझमी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालंय. विधीमंडळाबाहेर राणे-आझमी यांच्यात खडाजंगी सुरु होती. यावेळी नितेश राणेंना आझमी यांनी चॅलेंज दिलं आहे. तर राणेंनीही आक्रमक पवित्रा घेत चॅलेंज स्वीकारलंय.

अबू आझमी यांनी राणेंना ‘लव्ह जिहाद’ सिद्ध करण्याचे आव्हान दिले, ते नितेश राणे यांनी मान्य केले. तुम्ही तारीख आणि वेळ सांगा, मी माझ्यासोबत घेईन, मग तुला लव्ह जिहाद मानावे लागणार असल्याचं आव्हान नितेश राणेंनी दिलं.

तर मी तुम्हाला 50 ठिकाणी घेऊन जाईन, त्यावर नितेश राणे म्हणतात मी तुम्हाला 10 हजार ठिकाणी घेऊन जाईन’ असे सांगतात. हिंदू-मुस्लिम अशीच साथ राहणार आहे. प्रेमाची नाती आपल्यात कायम राहो हीच प्रार्थना, ही नाती तुटली तर भारत तुटेल, असं आमदार आझमी यांनी म्हंटलंय.

ED विक्रांत घोटाळ्यात चूप राहिली, असत्यमेव जयते!; राऊतांचा ईडीच्या कार्यपद्धतीवर निशाणा

तुम्ही चुकीची माहिती देत असल्याचं आमदार आझमी हे नितेश राणेंना म्हणत असल्याचं दिसून येत आहेत. ‘लव्ह जिहाद’ खोटे आहे, असे काही होत नसल्याचं ते म्हणाले आहेत. तर नितेश राणेंकडून त्यांच्या या उत्तराचा आक्रमक विरोध केला आहे.

आमदार नितेश राणे म्हणाले, अबू आझमी सत्य स्वीकारत नाहीत. त्यांना जे काही सांगायचे असेल त्यांनी पत्रकार परिषदेत येऊन सांगावं मला काही हरकत नसल्याचंही आमदार राणे म्हणाले आहेत.

अबू आझमी यांच्यामध्ये सत्य ऐकण्याची ताकद नाही. अशा लोकांमुळे त्या लोकांना मदत होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच मोजक्या चार पाच लोकांची माहिती घेऊन लव्ह जिहाद आणि धर्मांतर प्रश्नाला विरोध करणे हे बरोबर नसल्याचंही राणे म्हणाले आहेत.

पुण्यातल्या संतप्त पतीचा कारनामा; घटस्फोटाची नोटीस येताचं जाळल्या गाड्या

अशा लोकांमुळेच राज्यातील अनेक मुलींचे आयुष्य बरबाद झाल्याचा आरोपही नितेश राणे यांच्याकडून यावेळी करण्यात आला आहे. ज्या मुलींचे आयुष्य उध्वस्त झाले आहे ते ऐकण्याची यांच्यात हिंमत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आझमी आणि राणे यांच्यात खडाजंगी सुरु असताना राणे चांगलेच आक्रमक झाले होते.

त्याचप्रमाणे विधी मंडळात मी जे खरं बोललो ते त्यांना खटकलं असून मी लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधातील खरी माहिती देतो हे त्यांना पटलं नाही. यांच्या या प्रयत्नामुळे हिंदु मुलींचे आयुष्य बरबाद होईल त्याला कोण जबाबदार हे असणार का? असा सवालही आमदार राणे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Local Body Election : राज्यातील महत्वाच्या महापालिका निवडणुका अधांतरीचं

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील विविध जिल्ह्यांत हिंदु संघटनांकडून लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधात मोर्चा काढण्यात आले आहेत. यावेळी हिंदु संघटनांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आल्याचं दिसून आले.

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना

दरम्यान, राज्यात एक लाख लव्ह जिहादची प्रकरणे असल्याचा दावा नितेश राणे करत असल्याचं दिसून येतंय. याबाबत राणे यांनी अद्याप स्पष्ट केलं नसून लवकरच पत्रकार परिषदेत स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राणे-आझमी यांच्यात खडाजंगी झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा लव्ह जिहाद आणि धर्मांतर प्रकरणावरुन पुन्हा एकदा राजकारण तापणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags

follow us