Local Body Election : राज्यातील महत्वाच्या महापालिका निवडणुका अधांतरीचं

Local Body Election : राज्यातील महत्वाच्या महापालिका निवडणुका अधांतरीचं

Maharashtra Local Body Election :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली ( Supreme Court )  आजची सुनावणी अधांतरीच राहिली आहे. आजच्या नियोजित तारखेला सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या याचिकेवर गेल्यावर्षी जुलैपासून वारंवार तारखा पडत आहेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या अनेक कालावधीपासून रखडल्या आहेत.

राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयात केस सुरु होती. त्यानंतर न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षणाला मंजूरी दिली. परंतु आधीच्या जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये देखील ओबीसी आरक्षण लागू व्हावे यासाठी सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार हे सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.

Thackeray Vs Shinde : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला राज्यपालांनी स्वीकारला; हरीश साळवे यांचा युक्तिवाद

सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसमोर आहे. आज 14 मार्च रोजी  या प्रकरणावर सुनावणी होणार असे सांगण्यात आले होते. परंतु आज याचिकाच मेंशन न  झाल्याने या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे.  दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे निवडणुका कधी होणार याबाबत साशंकता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या 2006 च्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमधील निवडणुका या फक्त सहा महिने लांबवता येऊ शकतात. पण सध्या गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनेक महापालिका व नगरपालिका यांचा कारभार हा प्रशासकाच्या मार्फत चालवला जात आहे. मधल्या काळात कोरोनामुळे या निवडणुका झाल्या नव्हत्या. आता सर्व पक्ष या निवडणुकांची वाट पाहत आहेत.

मद्यधुंद अवस्थेत अमिताभ बच्चन यांना भेटायला गेला कपिल शर्मा, मग बच्चन यांनी….

शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर वॉर्ड रचना बदलण्याचा निर्णय एका अध्यादेशाद्वारे केला. त्याच्या विरोधात देखील महाविकास आघाडीचे काही नेते हे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे या निवडणुका कधी होणार हे सध्या तरी न सांगता येणारे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube