‘माझ्यासमोर येऊन बोला, तंगड्या तोडून हातात देईल’, नितेश राणेंचा संजय राऊतांवर शा‍ब्दिक हल्ला

Nitesh Rane On Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर

Nitesh Rane On Sanjay Raut : 'माझ्यासमोर येऊन बोला, तंगड्या तोडून हातात देईल', नितेश राणेंचा संजय राऊतांवर शा‍ब्दिक हल्ला

Nitesh Rane On Sanjay Raut : 'माझ्यासमोर येऊन बोला, तंगड्या तोडून हातात देईल', नितेश राणेंचा संजय राऊतांवर शा‍ब्दिक हल्ला

Nitesh Rane On Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर केलेल्या टीकेला आज नितेश राणे यांनी प्रत्युत्तर देत हिम्मत असेल तर माझ्यासमोर येऊन बोला. तुमच्या तंगड्या तोडून हातात देईल अशी टीका  खासदार संजय राऊतांवर केली. ते आज सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते.

यावेळी नितेश राणे म्हणाले की, शनिवारी राऊत यांनी मला शिवी घातली, त्यांना मी सांगेल की एका बापाची औलाद असेल तर माझ्यासमोर येऊन बोला तेव्हा तुमच्या तंगड्या तोडून हातात देईल. तुम्ही आम्हाला शिव्या घातल्या तर आम्ही गप्प बसू का? लक्षात ठेवा आम्ही बाळासाहेबांच्या तालिमीत तयार झालेले शिवसैनिक होतो, आम्ही कुणाची दलाली करून अजिबात मोठे झालेलो नाही अशी टीका नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर केली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कुठे जावं आणि कुठे प्रचार करावा हे तुम्हाला शिकवण्याची गरज नाही असं देखील यावेळी नितेश राणे म्हणाले.

माध्यमांशी बोलताना पुढे नितेश राणे म्हणाले की, तुमचे मालक मुख्यमंत्री होते तेव्हा मेट्रो प्रकल्पाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना मिळू नये म्हणून त्यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली. जर भाजपने आणलेल्या प्रकल्पांना चालना मिळत असेल तर तुमच्या सारखे पाकिस्थानी व्यक्तींना राग येणं साहजिक आहे असेही ते म्हणाले. तसेच महाराष्ट्राचा विकास होत असेल तर यांना असंच झोंबणार, असा टोला देखील यावेळी नितेश राणे यांनी संजय राऊतांना लावला.

तसेच विधानसभा निवडणुकीनंतर आमचं सरकार येणार आहे आणि ते सरकार आलं की तुमच्यासारख्या 420 चोरांना ऑर्थर रोड जेलमध्ये टाकणार, त्यावेळी तुम्ही आणि तुमचे मालक शेमड्या मुलासारखे आमच्या नेत्यांच्या घरासमोर येऊन लोळू नका, असा धमकीवजा इशाराही यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना दिला.

… तर मी दोनवेळ जेवू शकले असते, पंतप्रधान मोदींसमोरच आशा भोसले भावुक

तर माध्यमांशी बोलताना त्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, अंमली पदार्थाची चिंता संजय राऊत यांनी करू नये कारण अंमली पदार्थांचा बादशाह मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर झोपतो, आदित्य ठाकरे यांची रक्तचाचणी करावी, त्यांच्या रक्तात नक्कीच घटक आढळून येतील. अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

Exit mobile version