… तर मी दोनवेळ जेवू शकले असते, पंतप्रधान मोदींसमोरच आशा भोसले भावूक

… तर मी दोनवेळ जेवू शकले असते, पंतप्रधान मोदींसमोरच आशा भोसले भावूक

Asha Bhosle : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा दिला आहे. यानिमित्त आज मराठी भाषा विभागाच्या वतीने खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेबद्दल ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना आशा भोसले म्हणाल्या की, राज्य सरकारने लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये दिले आहे त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी माझ्याशिवाय आणखी कोणाला कळणार नाही. हे काम जर 1947 कोणी केलं असतं तर तेव्हा मला 1500 रुपये मला मिळाले असते, तर मी दोनवेळ जेवू शकले असते असं आशा भोसले म्हणाल्या.

तसेच तेव्हा मला कोणी 1500 रुपये दिले असते तर मी सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. मी अन्न साठवून ठेवायचे. मी दुपारी जेवू शकत नव्हते, जेव्हा माझे पती घरी यायचे तेव्हा आम्ही एकत्र जेवायचो असेही या कार्यक्रमात बोलताना आशा भोसले म्हणाल्या. तसेच मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबाबत मी केंद्र सरकारचे आभार मानते. असेही त्या म्हणाल्या.

Haryana Election 2024 : हरियाणात पुन्हा भाजप? जाणून घ्या सट्टा बाजार अंदाज

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सरकारने पात्र महिलांच्या खात्यात 3 हफ्ते जमा केले आहे तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरपूर्वी बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube