Haryana Election 2024 : हरियाणात पुन्हा भाजप? जाणून घ्या सट्टा बाजार अंदाज

Haryana Election 2024 :  हरियाणात पुन्हा भाजप? जाणून घ्या सट्टा बाजार अंदाज

Satta Bazar Predictions on Haryana Election 2024 : हरियाणाच्या सर्व 90 विधानसभा (Haryana Election 2024) जागांसाठी आज मतदान पार पडले आहे. यानंतर हरियाणात पुन्हा भाजपची (BJP) सत्ता येणार की काँग्रेस (Congress) बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. यातच हरियाणा निवडणुकीवर सध्या अनेक एक्झिट पोल (Haryana Exit Poll) समोर येत आहे. या एक्झिट पोलमध्ये हरियाणात 10 वर्षानंतर काँग्रेस सत्तेत येणार असल्याचे संकेत मिळत आहे तर दुसरीकडे हरियाणा निवडणुकीवर सट्टा बाजाराने देखील अंदाज वर्तवले आहे.

फलोदी सट्टा बाजारने (Phalodi Satta Bazaar) हरियाणात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनले आणि या निवडणुकीत काँग्रेसला 56 ते 58 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे तर भाजपला 24 ते 26 जागांवर विजय मिळवता येणार असल्याचा अंदाज फलोदी सट्टा बाजाराने वर्तवला आहे. तर दुसरीकडे हरियाणाच्या बेटिंग मार्केटनुसार काँग्रेस 57 ते 59 जागा जिंकणार आहे आणि मुंबई बेटिंग मार्केटनुसार, हरियाणात काँग्रेसला 58 ते 60 तर भाजपला 22 ते 23 जागा मिळू शकतात.

एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत

हरियाणा निवडणुकीतील बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मॅट्रिस एक्झिट पोलनुसार हरियाणामध्ये काँग्रेसला 55 ते 62 भाजपला 18 ते 24 आणि जेजेपीला 0 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर न्यूज 24 च्या एक्झिट पोलमध्ये देखील काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Haryana Exit Poll मध्ये भाजपला मोठा धक्का, हरियाणात 10 वर्षांनंतर काँग्रेस सरकार

या पोलनुसार काँग्रेसला 52 ते 64 भाजपला 22 ते 32 आणि अन्यला 0 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल 08  ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली आहे. त्यामुळे भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार का? काँग्रेस 10 वर्षानंतर सत्तेत येणार यासाठी 08 ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 तर काँग्रेसने 31 आणि जेजेपीने 10 जागांवर विजय मिळवला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube