सत्ता विरोधी वातावरण अन् विरोधकांचा हल्लाबोल तरीही भाजपने हरियाणात मारलं मैदान, जाणून घ्या कसं?
Haryana Election : हरियाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. 05 ऑक्टोबर रोजी हरियाणा विधानसभेसाठी 90 जागांवर मतदान पार पडले होते त्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये हरियाणामध्ये काँग्रेस 10 वर्षांनंतर सरकार स्थापन करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आज निकालाच्या दिवशी अनेकांना धक्का देत भाजप (BJP) पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहे.
08 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणीच्या पहिल्या तासात काँग्रेसने 90 पैकी तब्बल 70 जागांवर आघाडी घेतल्याने हरियाणामध्ये काँग्रेस 10 वर्षानंतर सरकार स्थापन करणार असं वाटत होते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देखील जोरदार जल्लोष सुरु करण्यात आला होता मात्र त्यानंतर ट्रेंडमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आणि भाजपने आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला. मात्र हरियाणामध्ये भाजपने कमबॅक कसं केलं आणि कोणते मुद्दे काँग्रेसच्या विरोधात गेले हे जाणून घ्या.
जटलँडमध्ये काँग्रेसला फटका
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपला जाट प्राबल्य असलेल्या जागांवर यावेळी मोठा फटका बसेल आणि याचा फायदा थेट काँगेसला होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र असं काही झालं नाही आणि जाट प्राबल्य असलेल्या जागांवर भाजपला पुन्हा एकदा फायदा झाला. हरियाणामध्ये जाट प्राबल्य असलेले 33 जागा आहे. यापैकी भाजपने आतापर्यंत 15 जागांवर विजय मिळावला आहे. 2019 च्या तुलनेत यावेळी भाजपला 5 जागांचा फायदा झाला.
शहरी मतदार पुन्हा भाजपसोबत
भाजपचं हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा मुख्य कारण म्हणजे शहरी मतदार होय. यावेळी देखील भाजपला शहरी जागांवर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाला आणि त्यामुळे भाजपने शहरी भागात 21 जागांवर विजय मिळावला तर काँग्रेसला शहरी भागात 8 जागा जिंकता आल्या.
ग्रामीण भागातही भाजपला फायदा
शहरी मतदारांसोबत ग्रामीण भागात देखील मतदारांनी भाजपला समर्थन देत काँग्रेसला मोठा धक्का दिला. या निवडणुकीमध्ये भाजपला ग्रामीण भागात 27 जागांवर विजय मिळाला आहे तर 2019 मध्ये भाजपला ग्रामीण भागात 19 जागांवर विजय मिळाला होता. तर दुसरीकडे काँग्रेसला यावेळी ग्रामीण भागात 5 जागांचा फटका बसला आहे.
अपक्ष उमेदवार
तसेच या निवडणुकीत आकडेवारीनुसार काँग्रेसला अपक्ष उमेदवारांचा देखील फटका बसला आहे. त्यामुळे काँग्रेसची 10 वर्षांनंतर सरकारमध्ये येण्याची संधी हुकली. हिसार मतदारसंघातून सावित्री जिंदाल यांनी काँगेस उमेदवाराचा पराभव केला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ‘दिवाळी गोड’, आमदार आशुतोष काळेंची मोठी घोषणा
हरियाणा नंतर आता भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता आण्याची जोरदार तयारी करत आहे. आतापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघडीचा (MVA) पराभव करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकाची घोषणा देखील होणार आहे. त्यामुळे हरियाणानंतर भाजप महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार का? याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.