कोणतीही भाषा खपवून घेणार नाही; अजित पवारांचा कोकणातूनच नितेश राणेंना निर्वाणीचा इशारा

  • Written By: Published:
कोणतीही भाषा खपवून घेणार नाही; अजित पवारांचा कोकणातूनच नितेश राणेंना निर्वाणीचा इशारा

DCM Ajit Pawar On Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधाने करत आहेत. पण यावर आता महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. राणे यांच्या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. त्यामुळे राणेंविरोधात राष्ट्रवादीचे (NCP) नेते आक्रमक झाले आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी चिपळून येथील सभेत राणे यांना थेट निर्वाणीचा इशारा दिलाय.

अजित पवार म्हणाले, आपण सगळे गुण्यागोविंदाने राहतोय. जातीय सलोखा राहिला पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वधर्म मानणारा आहे. ही आमची भूमिका आहे. मी सगळ्या समाजासाठी काम करतोय. अल्पसंख्याक समाजासाठी मार्टी काढली आहे. एक हजार कोटी रुपयांचे भागभांडवल मौलाना आझाद महामंडळाला दिले आहे. ओबीसी समाजासाठी महाज्योती काढली आहे. सगळ्या घटकाला बरोबरी घेऊन गेले पाहिजे. पण काही जण चुकीचे वागत आहेत. मी त्यांना निर्वाणीचा इशारा दितोय, असं चालणार नाही. कुठल्या जातीने, धर्माने, पंथाने एकमेंकाचा अनादर करायला शिकविले नाही.


… तर मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील, नितीन गडकरींनी दिला जनतेला कानमंत्र

शिवाजी महाराजांच्या काळातही सर्व अठरापगड जातीला न्याय मिळत होता. त्यांच्याच विचाराचे हे राज्य सुरू. त्यामुळे काही जण बोलता बोलता कसला प्रकाराची भाषा वापरतात. अशा प्रकाराची भाषा वापरता येणार नाही. चव्हाणसाहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण दिली आहे. तुम्ही असली भाषा वापरत आहात. हे आम्ही खपवून घेणार नाही. महायुती म्हणून आज आम्ही त्या सरकारमध्ये आहे. पण त्यामध्ये चुकेल त्याला शासन होईल. तो कुठल्याही जाती धर्माचा असो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देणार, नितीन गडकरींची ग्वाही

राणेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
नितेश राणे हे मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधाने करत आहेत. त्याविरोधात अजित पवार गट आक्रमक झालेला आहे. नितेश राणे यांची तक्रार थेट भाजपच्या हायकंमाडकडे करण्यात आलेली आहे. तर संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी आता थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याविषयी पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र सोशल मीडियावरही टाकले आहे. आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केलीय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube