Download App

मी ब्राह्मण, परमेश्वराचे मोठे उपकार आम्हाला आरक्षण नाही, नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य

Nitin Gadkari On Reservation : मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राज्यात सध्या जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.

  • Written By: Last Updated:

Nitin Gadkari On Reservation : मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राज्यात सध्या जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यावरून आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणावरुन महत्वाचे विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात आरक्षणाबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

मी ब्राह्मण समाजाचा असून आमच्यावर परमेश्वराने सर्वात जास्त काय उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण (Reservation) नाही असं नागपूर येथील हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्यावर परमेश्वराने सर्वात जास्त काय उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात ब्राह्मणांना जास्त महत्व नाही. पण उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये ब्राह्मणांना खूप महत्व आहे. मी तिकडे जातो तेव्हा दुबे, त्रिपाठी, मिश्रा या ब्राह्मण समुदायाचं राज्य पॉवरफूल आहे. जसं इकडे मराठा जातीचे महत्व आहे तसं तिकडे ब्राह्मण समाजाचे महत्व आहे. मी त्यांना म्हणालो की, मी जातपात मानत नाही. कोणताही माणूस जात, पंथ, धर्म आणि लिंग यापैकी कोणत्याही घटकामुळे मोठा होत नाही, तर तो गुणांमुळे मोठा होतो. समाजात ज्यांची मुलंबाळं चांगली शिकली आहे त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे. असं या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

बग्राम एअरबेस परत करा नाहीतर… ट्रम्प यांची तालिबानला उघड धमकी

सरकारी अधिकाऱ्यावर दबाव असतो : नितीन गडकरी

पुढे या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, प्रत्येकाने चांगले काम करायला हवे. त्याचे श्रेय निश्चित मिळते. परंतु राजकारण्यांच्या जवळचे कंत्राटदार आर्टिटेक्ट यांना काम द्या, त्याला देऊ नका, असा सरकारी अधिकाऱ्यावर दबाव असतो. त्यावर मार्ग काढत चांगल्या दर्जाचे काम करायला हवे असं देखील मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

follow us