कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फ्यूएल शिक्षण संस्था समूहच्या फ्यूएल बिझनेस स्कूलचा पहिल्या दीक्षांत समारंभात व्यक्त केलंय.

Untitle (91)

Nitin Gadkari : देशात सर्वात मोठी समस्या रोजगार निर्मितीची आहे, अशा वेळेस सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे हे अद्वितीय कार्य असून फ्यूएल यशस्वीपणे पार पाडत आहे. यामुळे युवकांचे जीवन बदलून भारत आत्मनिर्भरतेकडे उंच भरारी घेत असल्याचं मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले.

Ahilyanagar Rain : जनावरं, पिकं, पूल वाहुन गेले; अहिल्यानगरमध्ये आभाळ फाटलं…

शिक्षण, कौशल्य विकास व रोजगारक्षमतेसाठी कार्यरत फ्यूएल शिक्षण संस्था समूहच्या फ्यूएल बिझनेस स्कूलचा पहिल्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तसेच वन व्हिजन, वन मिशन आणि स्किल्ड नेशन या तत्वांवर आधारित फ्यूएलचा १९ वा वर्धापन दिवस भूगाव येथील संस्थेत उत्साहात साजरा झाला. या वर्षी २०० विद्यार्थ्यांना सीएसआर शिष्यवृत्ती व डिग्री प्रदान करण्यात आली. यावेळी फ्यूएल शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष व सीईओ डॉ. केतन देशपांडे, चीफ मेंटॉर संतोष हुर्लेकोप्पी, फ्यूएलच्या सीओओ मयूरी देशपांडे, संस्थेच्या स्ट्रॅटेजी आणि पार्टनरशिपचे उपाध्यक्ष सर्वेश कुबेरकर, ऑपरेशन्स व मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष बाजीप्रभू देशपांडे व मुख्य प्रशासक कर्नल किरण कानडे उपस्थित होते.

नितीन गडकरी यांच्या हस्ते फ्यूएल बिझनेस स्कूलमध्ये पीजीडीएम (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स) अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच फ्यूएल आणि कॅपजेमिनीमध्ये एमओयू करण्यात आला. तसेच डॉ. केतन देशपांडे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कार्याला पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा विशेष सन्मान केला. तसेच सीएसआरमध्ये कार्यरत व्यक्तिंना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम लीडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात आला. यामध्ये सुदिप्ता पॉल, वामशी मुथ्थापू, सुमीत शहा, रेखा पिल्ले, रिया वैद्य, धनश्री पागे, बिना बलदोटा, शिल्पाश्री, अर्पणा पांडे यांचा समावेश आहे.

पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं, दरवाजाही बंद केला; टीम इंडियाने मैदानाबाहेरचाही सामना जिंकला 

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, जल, जमीन आणि जंगल यांचा विकास होणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने शहरे स्मार्ट होत चालली आहेत त्याच पद्धतीने येणार्‍या काळात आपली गावे स्मार्ट होणे गरजेचे आहे. कौशल्यपूर्ण शिक्षण हे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीस हातभार लावतो. परदेशात फामर्सी, नर्सिंग सेवकांची गरज मोठ्या प्रमाणात आहे, मात्र कौशल्यपूर्ण व्यक्तींचा अभाव जाणवतो. सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यासाठी सक्षम होत आहेत. सहकार, समन्वय आणि संवादातून कौशल्याधारित स्टार्टअप संस्कृती रुजू होत आहे. तंत्रज्ञान, संशोधन व ज्ञान या त्रिसूत्रीचा वापर करूनच रोजगार निर्मिती शक्य आहे. फ्यूएल ही संस्था उदयोगधंद्याना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करत असल्याचं गडकरी म्हणाले आहेत.

“ओबीसीतील आरक्षण जर चोरून कुणी..”, एकनाथ खडसेंचा सरकारला रोखठोक इशारा
   
तसेच डॉ. केतन देशपांडे म्हणाले, सोशल आंत्रप्रेन्यूअरशीपची चळवळ उभी करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आज ७८ कॉर्पोरेट कंपन्यांच्या समर्थनामुळे एक नवे शिक्षण मॉडेल सर्वांसमोर आहे. काळानुरूप आता व्हर्टीकल युनिव्हर्सिटीची गरज भासू लागली आहे. कार्यक्रमात अंडरग्रॅज्यूएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि सीएसआर समर्थित सर्टिफिकेट प्रोग्रॅम्समधील विद्यार्थ्यांना पदवी व प्रमाणपत्र देण्यात आली. तसेच देशातील अग्रगण्य कॉर्पोरेट प्रतिनिधिसह सीएसआर व एचआर पॅनल चर्चासत्र ही पार पडले. सूत्रसंचालन मानसी यांनी केले. चीफ मेंटॉर संतोष हुर्लेकोप्पी यांनी आभार मानले.

follow us