मोठी बातमी! नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकी, सरक्षेत वाढ

मोठी बातमी! नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकी, सरक्षेत वाढ

Union Minister Nitin Gadkari Threatens : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Gadkari) यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकी ही देण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गडकरींच्या घराची सुरक्षा आता वाढण्यात आली आहे. या फोननंतर शहरात एकच खळबळ उडाली. मिळालेली अधिक माहितीनुसार आज रविवारी सकाळी 8:46 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर फोन आला आणि थेट गडकरी यांच घर बॉम्बने उडवून टाकणार असल्याचे म्हटले.

स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. धमकीच्या फोननंतर नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर प्रताप नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस आणि श्वान पथक गडकरी यांच्या घरात शोध मोहीम राबवत आहेत. यादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमध्ये असतानाच असा धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली आहे. नितीन गडकरी हे सध्या त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी आहेत.

अनुभवातून लक्षात आले की, सरकार निकम्मी; गडकरींच्या विधान अन् चर्चांना उधान

गडकरींच्या घराबाहेर छावणीचे स्वरूप प्राप्त झालंय. पोलिस दलातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी देखील गडकरींच्या घराकडे धाव घेतली. आजुबाजूच्या परिसराचा तपास कसून केला जात आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमध्ये असतानाच असा धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली आहे. नितीन गडकरी हे सध्या त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी आहेत. गडकरींच्या घराबाहेर छावणीचे स्वरूप प्राप्त झालंय. पोलिस दलातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी देखील गडकरींच्या घराकडे धाव घेतली. आजुबाजूच्या परिसराचा तपास कसून केला जात आहे.

उमेश राऊत अस कॉल करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो मेडिकल परिसरातील देशी दारूच्या दुकानात नोकरी करतो. आपल्या एका मित्रासोबत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत भाड्याने राहतो. धमकीचा कॉल येताच पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सेक्युरिटीला याची माहिती दिली आणि बिडीडीएस पथकाच्या त्यांच्या दोन्ही घरी पोहचले. मात्र, दोन्ही ठिकाणी काहीच मिळून आलं नाही. पोलिसांनी आता त्याची चौकशी सुरू केली असून त्याने असा धमकीचा कॉल का केला याचा शोध घेत आहे. आरोपीचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासात पुढे आलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या