अनुभवातून लक्षात आले की, सरकार निकम्मी… गडकरींच्या विधान अन् चर्चांना उधान

Minister Nitin Gadkari on Government in Nagpur discussion in politicle circle : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे जरी भाजपमध्ये असले तरी ते अनेकदा राजकीय नेत्यांवर सर्वसामान्यपणे स्पष्ट टिप्पणी करतात. त्यातून ते कधी भाजपलाच घरचा आहेर देत आहेत की, काय? असा प्रश्न ही पडतो. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांचे सर्वच पक्षांमधून कौतुकही होतं. एखादी गोष्ट पटली नाही की ते थेट सांगतात.
मुंबई-पुण द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, ट्रेलरची 20 वाहनांना धडक; 4 जणांचा मृत्यू
तसेच त्यांचे स्वतःच्या कामाविषयी देखील त्यांना संपूर्ण माहिती असते. अशातच त्यांनी नागपूर मध्ये बोलताना एक विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. गडकरी म्हणाले की माझ्या अनुभवातून लक्षात आले की सरकार निकम्मी असते त्यामुळे गडकरींनी भाजपला घरचा आहेर दिला आहे का अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.
नितीन गडकरी असं का म्हणाले?
मला नागपूरमध्ये खेळाचे 300 स्टेडियम बनवायचे आहेत. पण माझ्या चार वर्षांच्या अनुभवातून हे लक्षात आलं आहे की, सरकार निकम्मी अस.ते महानगरपालिका, एनआयटी यांच्या भरवशावर काही काम होत नाहीत. चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं महारत यांच्याकडे आहे. तसेच मी राजकारणात आहे. हा फुकट्यांचा बाजार आहे. प्रत्येक गोष्ट फुकटची पाहिजे असते. पण मी फुकटचं देत नाही. असं म्हणत गडकरी यांनी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांवरून टोला लागवाला आहे का? असं बोललं जात आहे.
मोठी बातमी! आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान
तसेच ते पुढे म्हणाले की, माणूस नशेत असतो तेव्हा विचार करणं बंद करतो. नशा म्हणजे दारूची नव्हे, तर खेळाची नशा असते, राजकारणाची असते तर कोणाला ज्ञानाचीही नशा असते. म्हणून या नशेमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा तो विचार करायचा बंद करतो. जेव्हा त्याला यश मिळतं. तेव्हा त्याला यशाची सवय होते. मात्र सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य हे सगळं क्षणभंगुर आहे. त्यामुळे आपल्याला 75 ते 80 वर्षांपर्यंत चांगलं जीवन कसे जगता येईल? याची व्यवस्था करून ठेवायला हवी. कारण चांगले दिवस असताना सर्वच जण स्तुती करतात. मात्र जेव्हा आपली वेळ संपते त्यावेळी आपला कोणीही विचार करत नाही.