Download App

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं चर्चेतलं विधान! ‘शरद पवार म्हणजे जपानी गुडीयाचं’…

Nitin Gadkari News : राजकारणात परखत मत व्यक्त करणारे नेते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. मनमोकळा संवाद आणि खास शैलीत विधानांमुळे गडकरी नेहमीच चर्चेत असतात. आत्ताही त्यांनी थेट शरद पवारांविषयी भाष्य करीत सर्वांच्याच भुवया उंचावतील, असं विधान केलं आहे. दरम्यान, नागपूरच्या ग्रामीण भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात गडकरी बोलत होते.

Asia Champion कुस्ती स्पर्धेत जामखेड गाजलं; सुजय तनपुरेला सुवर्णपदक

शरद पवार म्हणजे जपानी गुडीया, प्रत्येकाला वाटतं की ती आपल्याकडे बघुनच डोळा मारत आहे, जपानी गुडिया जशी प्रत्येकाकडे बघून डोळा मारते तसचं काहीसं शरद पवार यांचं आहे. कार्यकर्त्याला असचं वाटतं साहेब आपल्याकडे बघून बोलत आहेत, कामाला लागा. पण त्यानंतर तिकीट मात्र भलत्यालाच मिळतं’, या शब्दांत मंत्री नितीत गडकरी यांनी शरद पवारांवर टोलेबाजी केली आहे. यावेळी गडकरींनी पवारांना जपानी गुडीया असं संबोधताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं दिसून आलं आहे.

या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना गडकरींनी कार्यकर्त्यांना कानमंत्रच दिला आहे. ‘थिंक फॉर द बेस्ट अॅन्ड प्रीपेअर फॉर द वर्स्टट, ‘आपण नेहमी आपलं काम व्यवस्थित करावं. मिळालं तर बोनस नाही मिळालं तर दु:ख नाही’, असा कानमंत्रच गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच कोणत्याही नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नसतो, अशी मिश्लिक टिप्पणीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव उद्या कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर; कोणत्या पक्षाला धक्का देणार?

आपली रोखठोप भूमिका मांडण्यामध्ये नितीन गडकरी कायमच चर्चेत असतात. नूकत्याचं नागपुरातील देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली होती. ते म्हणाले, लोक म्हणतात तुम्ही काहीही स्वप्न दाखवता, पण लक्षात ठेवा स्वप्न दाखवणारे नेतेच लोकांना आवडतात, पण दाखवलेले स्वप्न पूर्ण करीत नाही अशा नेत्यांची लोक धुलाई केल्याशिवाय देखील राहत नसल्याची टोलेबाजी गडकरी यांनी केली होती. देवेंद्र फडणवीसांसमोरच गडकरींनी हे विधान केल्याने एकच चर्चा रंगली होती.

दरम्यान, कालच्या विधानानंतर आता पुन्हा शरद पवारांना ‘जपानी गुडीया’ अशी उपमा देत खोचक टीका केली आहे. गडकरींनी पहिल्यांदाच शरद पवारांचं नाव घेत टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांच्या या टीकेवर काय प्रत्युत्तर मिळेल? पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us