तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव उद्या कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर; कोणत्या पक्षाला धक्का देणार?

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव उद्या कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर; कोणत्या पक्षाला धक्का देणार?

K.Chandrashekhar Rao : अनेक महिन्यांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चेंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रातील राजकीय दौरे वाढले आहेत. केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी एक प्रकारे धास्तीच घेतली आहे. केसीआर यांच्या दौऱ्यांवरुन विविध पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उद्या (दि.1) पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. गतवेळी आषाढी एकादशीचे औचित्य साधून केसीआर यांनी सोलापूर दौरा केला केला होता. आता ते कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर येणार आहेत.(Telangana CM K Chandrashekhar Rao On Sangli Kolhapur Tour meet raghunathdada patil BRS)

Manipur Violence : मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; महिला अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याची मागणी

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचं उद्या हैदराबादहून कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते सांगलीमधील वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या साखराळे येथील घरी दुपारी दोन वाजता केसीआर यांच्यासाठी भोजणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता ते कोल्हापूरमध्ये करवीर निवासीनी अंबाबाईच्या दर्शनासाठी पोहोचणार आहेत. त्याचबरोबर पुढे राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा हैदराबादकडे जातील.

Ahmednagar News : राहुरीतील धर्मांतराचा मुद्दा थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी… मुंबईमध्ये होणार महत्वाची बैठक

गेल्या काही दिवसांपासून केसीआर आपल्या बीआरएस पक्षाचा विस्तार महाराष्ट्रात करण्यासाठी अग्रेसर दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केसीआर यांच्याकडून राज्यातील विविध पक्षातील नेत्यांना गळ घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारली. त्या पुढे जाऊन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही बीआरएसकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. मात्र अद्यापही बीआरएस पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठीचा मोठा आश्वासक चेहरा मात्र मिळाला नाही.

उद्याच्या दौऱ्यामध्ये शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या घरी केसीआर भेट देणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच रघुनाथदादा आता केसीआर यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश करण्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. अब की बार किसान सरकार म्हणून वातावरण निर्मिती करत असलेल्या केसीआर यांच्या पक्षात रघुनाथदादा प्रवेश करुन आपली आगामी राजकीय वाटचाल सुरु करणार असल्याच्या जोरदार चर्चा सांगली जिल्ह्यात रंगल्या आहेत.

उद्या केसीआर कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने चौकाचौकात जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या चौकाचौकामध्ये बीआरएसचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या सांगलीसह कोल्हापूरमध्येही काही राजकीय भेटीगाठी होणार का? याकडे कोल्हापूरसह सांगलीकरांचं लक्ष लागलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube