Download App

गडकरींना धमकी देणाऱ्या आरोपीचे दाऊद, लष्कर-ए-तोयबाशी संबंध!

  • Written By: Last Updated:

Nitin Gadkari Threat Case : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर हा लष्कर-ए-तोयबा, दाऊद आणि पीएफआय या संघटेच्या संपर्कात होता. पोलिसांच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे त्याच्याकडून होत आहेत. त्यात नितीन गडकरी धमकी प्रकरणाचे धागेदोरे सिमेपलीकडे असल्याची माहिती मिळत आहे, असे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

अमितेशकुमार म्हणाले की, या प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणा आणि नागपूर पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. दहशत वाद्यांशी लढताना जो कायदा वापरला जातो आहे. तो यूएपीए कायद्यातील कलम नितीन गडकरी धमकी प्रकरणात आता लावण्यात येणार आहे.

अजितदादा भाजपात जाणार का ?, दमानियांच्या ट्विटवर पवारांचे एकाच वाक्यात उत्तर – Letsupp

आरोपी शाकिर हा गेल्या दहा वर्षात कर्नाटकातील वेगवेगळ्या जेलमध्ये असताना त्याचा वेगवेगळ्या दहशतवादी कृत्यातील संघटना, आरोपींशी संबंध आला आहे. त्यामुळेच नितीन गडकरी धमकी प्रकरणात आपण यूएपीए कायद्यातील कलम लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच या प्रकरणात श्रीलंकेतील लिट्टे या संघनेचा अद्याप काही संपर्क आल्याचे आमच्या तपासात आलेले नाही. मात्र, आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर हा लष्कर-ए-तोयबा, दाऊद आणि पीएफआय या संघटेच्या संपर्कात होता. त्याअनुषंगाने केंद्रीस तपास यंत्रणेबरोबर नागपूर पोलीस समन्वयातून तपास करच असल्याचे नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे.

Tags

follow us