Ketan Agarwal Death Case : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवीन नवीन खुलासे होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. तर दुसरीकडे आता हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली असून सिया गोलय हिच्याविरुद्ध पोलिसांकडे कोणताही स्वातंत्र्य प्रत्यक्षदर्शी किंवा ठोस पुरावा नसल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे.
माहितीनुसार, सिया गोयल (Siya Goyal) हिचे वकील आशुतोष श्रीवास्तव (Ashutosh Srivastava) यांनी दावा केला की, सियाच्या विरोधात पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नाही. सुरुवातीला केतनचा मृत्यू (Ketan Agarwal Death Case) अपघाती मृत्यू म्हणून नोंदवला होता मात्र त्यानंतर पोलिसांनी हत्याच्या अँगलने तपास सुरु केला. भारतीय साक्ष अधिनियमच्या कलम 23 नुसार, पोलिसांसमोर दिलेला कोणताही जबाब न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही, जोपर्यंत तो मॅजिस्ट्रेटसमोर आणि पोलिसांच्या अनुपस्थितीत नोंदवला जात नाही. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही आरोपीला स्वत:च्या विरोधात साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही असं सिया गोयलचे हिचे वकील आशुतोष श्रीवास्तव म्हणाले.
तसेच कायद्यानुसार, पोलिसांसमोर नोंदवलेले कोणतेही जबाब किंवा कबुली जोपर्यंत दंडाधिकाऱ्यांसमोर अधिकृतपणे नोंदवली जात नाही तोपर्यंत ती न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही असेही वकील आशुतोष श्रीवास्तव म्हणाले.
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
तर दुसरीकडे या प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती केली आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत न्यायाची मागणी करत वरिष्ठ वकिलाची नियुक्तीची मागणी केली होती. या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. तसेच या हत्या प्रकरणात सखोल तपासणी करण्यासाठी एसआयटीची (SIT) देखील राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आली आहे.
टक्कल होतं म्हणून लग्नास नकार, सिया गोलयचा दावा
तर केतन अग्रवालला टक्कल होतं आणि तो केसाचा विग वापरत होता म्हणून सियाला लग्न करायचा नव्हता असा दावा सियाने केला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी आता आरोपी सिया गोयलच्या दोन जवळच्या मैत्रिणींना देखील तपासासाठी बोलवण्यात आले आहे सियाच्या मैत्रिणींकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संजू सॅमसन आऊट अन् ‘या’ स्टार खेळाडूला संधी; दुसऱ्या टी20 साठी जाणून घ्या भारताची प्लेइंग 11
