Download App

विश्वास टाकला, पण दहा कोटींना चुना लावला ! दोघांनी मालकाचा ‘असा’ घात केला ?

Elite International firm: नगरमधील पुनित अभयराज गुगळे हे सिनियर अकौंटंट होते. तर संभाजीनगरमधील अन्सार शेख हा ज्युनियर अकौंटंट म्हणून नोकरी करत होता.

  • Written By: Last Updated:

10 crore scam Ahilyanagar Elite International firm: मालक हा आपल्या नोकरावर पूर्णपणे विश्वास टाकतो. आर्थिक व्यवहारही त्याचा हातात देतो. नोकरही त्याची जबाबदारी विश्वासानेच पार पाडतो. परंतु काहींची नियत फिरते आणि त्यातून घात होतो. असाच प्रकार अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar) एका कंपनीत घडलाय. अकौंटंट असलेल्या दोघांनी मालकाची थोडीथिडकी नाहीतर तब्बल दहा कोटींचा फसवणूक केलीय. दोघांनी हा दहा कोटींचा घोटाळा कसा केला ? हा घोटाळा कसा उघडकीस आला हेच या व्हिडिओतून पाहुया…


आता ट्रम्प तात्या नव्हे तर, म्हणायचं TACO; जाणून घ्या नावाचा अर्थ अन् नाव देण्यामागचं कारण…


इलाईट इंटरनॅशनल कंपनी काय करते ?

अहिल्यानगरमधील उमा विनोद गांधी यांची इलाईट इंटरनॅशनल ( Elite International) नावाची कंपनी आहे. याचे कामकाज त्यांचा मुलगा अभिजीत गांधी हा पाहतो. ही कंपनी इंडस्ट्रीयल पॅकेजिंग आणि ऑटो पार्टस इम्पोर्ट व एक्सपोर्टचा व्यवसाय करते. या फर्मचे हेड ऑफिस नगरमधील तेलीखुंट भागात आहे. तर चाकण एमआयडीसीमध्ये एक शाखा आहे. या कंपनीमध्ये 25 ते 30 कर्मचारी नोकरीला आहेत. तर नगरमधील पुनित अभयराज गुगळे हे सिनियर अकौंटंट होते. तर संभाजीनगरमधील अन्सार शेख हा ज्युनियर अकौंटंट म्हणून नोकरी करत होता. दोघेही अनेक वर्षांपासून नोकरी करत असल्याने फर्मच्या मालकांना त्यांच्यावर विश्वास बसला. सर्व आर्थिक व्यवहार हे दहा वर्षांहून अधिक काळ करत होते. गुगळे हे नातेवाइक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फर्मचा युजर नेम व पासवर्डही देण्यात आला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! ‘टॅरिफ वॉर’ न्यायालयाकडून स्थगित; ट्रम्प सरकारचा निर्णय घटनाविरोधी


अचानक नोकरी सोडली आणि संशय बळावला

पण 14 जानेवारी 2025 रोजी शेख याने पुण्याला व्यवसाय करायचा असल्याचे सांगून नोकरीचा राजीनामा दिला. तर दुसऱ्याच दिवशी पुनित गुगळे यांनीही नोकरीचा राजीनामा दिला. पुण्याला स्थायिक व्हायचे असल्याचे कारण गुगळे यांनी मालकाला सांगितले.


Video : फडणवीसांच्या पोटातलं ओठांवर आलचं; शिंदे अन् दादांचे अवगुण थेट सांगून टाकले


घोटाळा कसा झाला ?

परंतु दोघांनीही अचानक नोकऱ्या सोडल्याने अभिजित गांधी यांचा दोघांवर संशय बळविला. त्यांनी कंपनीचे टॅली स्वॉफ्टवेअर नोंदी आणि बँकांचे खाते तपासले. त्यांनी कंपनीचे ऑडिट केले. त्यात 2020 पासून पाच वर्षांत गुगळे व शेख या दोघांनी 9 कोटी 81 लाखांची चोरी केल्याचे उघड झाले. पण ही चोरी वेगळ्याच पद्धतीने केली. दोघांनी नातेवाइक व ओळखीच्या लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून घोटाळा केला. आरोपींनी इन्कम टॅक्स, पॉलिसी इन्शुरन्सच्या रकमा मालकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करणे अपेक्षित होते. मात्र, या रकमा त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर केल्या. तसेच कंपनीचे सप्लायर्स यांना द्यायच्या रकमा त्यांनी नातेवाइकांच्या खात्यावर वर्ग केल्या. दोघांनी चार वर्षांत कंपनीचे नऊ कोटी 81 लाख रुपये लंपास केल्याचे ऑडिटमध्ये आढळून आले.

नोकरांनीच फसविल्यानंतर अभिजित गांधी हे तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलिसांकडे गेले. परंतु पोलिसांनी दखल घेतली नाही. गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटले. त्यानंतर दीड महिन्याने गुगळे व शेखविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा लवकर नोंदविला असता तर आज फसवणूक करणारे दोघेही गजाआड झाले असते. परंतु आता आरोपी शोधून तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

follow us

संबंधित बातम्या