आता ट्रम्प तात्या नव्हे तर, म्हणायचं TACO; जाणून घ्या नावाचा अर्थ अन् नाव देण्यामागचं कारण…

  • Written By: Published:
आता ट्रम्प तात्या नव्हे तर, म्हणायचं TACO; जाणून घ्या नावाचा अर्थ अन् नाव देण्यामागचं कारण…

US President Donald Trump Gets New Name TACO Know Who Gave & What Does That Mean : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा उल्लेख अनेकदा भारतीय नागरिक ट्रम्प तात्या असा करतात. मात्र, आता ट्रम्प यांना नवीन नाव मिळालं असून, अमेरिकन न्यायालयाने ट्रम्प यांच्या ट्रॅरिफ धोरणाला (Tariff War) स्थगिती दिल्यानंतर TACO हे नाव सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेडिंगला आले आहे. पण हे नाव ट्रम्प यांना नेमकं कुणी आणि का दिलं? आणि या नावाचा नेमका अर्थ काय? याबद्दल जाणून घेऊया…

डोनाल्ड ट्रम्प अन् एलन मस्क यांच्या मैत्रीला तडे, मस्क ट्रम्प सरकारमधून बाहेर; सल्लागार पद सोडलं

नावाचा नेमका अर्थ काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अलिकडेच TACO या नवीन ट्रेडिंग टर्म असलेलं नाव देण्यात आलं आहे. याचा अर्थ Trump Always Chickens Out असा होतो. ज्याला मराठीत ट्रम्प अखेरच्या क्षणी नेहमीच मागे हटतात असा होतो. आता हे नाव कसं ट्रेडिंगला आलं असा प्रश्न जर तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर, याचे उत्तर काही दिवसांपूर्वी ट्रॅरिफ धोरणावर सातत्याने बदलणाऱ्या भूमिकांवरून पडलं आहे. ट्रॅरिफ धोरणांवर बदलणाऱ्या भूमिकांमुळे गुंतवणुकदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला अन् वॉल स्ट्रीटवर TACO हे नाव ट्रेडिंगला आले. मात्र, आता व्यापारी आणि गुंतवणूकदारांना असे वाटू लागले आहे की, ट्रम्प कितीही कठोर पावले उचलण्याची धमकी देत ​​असले तरी ते अखेर त्यांनी घेतलेल्या निर्णयांपासून मागे हटतात.

पाच वर्षात कोरोनाचे व्हेरिएंट बदलले मग, व्हॅक्सिनपण बदलली का?; येल विद्यापीठाचं रिसर्च काय सांगतं?

TACO वर काय म्हणाले होते ट्रम्प ?

ट्रम्प यांनी चीन आणि युरोपियन युनियन देशांवर (EU) कर लादण्याची धमकी दिली तेव्हा या शब्दाची सुरुवात झाली, परंतु अवघ्या काही दिवसात ट्रम्प स्वतःच्या विधानांवरून मागे हटले. सुरूवातीला ट्रम्प यांनी प्रथम चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवर145 % कर लावण्याची घोषणा केली, जी नंतर 100 % आणि अखेर 30% पर्यंत कमी करण्यात आली. याशिवाय ट्रम्प यांनी 1 जूनपासून युरोपियन युनियनच्या उत्पादनांवर 50% कर लादण्याची भाषा केली. ज्यानंतर शेअर बाजारात मोठा भूकंप झाला. पण याहीवेळी अवघ्या दोन दिवसांनंतर ट्रम्प यांनी ईयूसोबतची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे असे सांगत यू-टर्न घेत 9 जुलैपर्यंत वाट पाहणार असल्याचे सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! टॅरिफ वॉर; न्यायालयाकडून स्थगित; ट्रम्प सरकारचा निर्णय घटनाविरोधी

मागण्यांसाठी दबाबतंत्रांचा अवलंब 

जेव्हा एका पत्रकाराने ट्रम्प यांना ‘TACO’ या शब्दावर भाष्य करण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले की, “मी मागे हटतो? हे मी कधी ऐकले नाही असे म्हणत टेरिफ शुल्क कमी केल्यानेच मला TACO हे नाव मिळाले आहे ना? असे म्हणत ट्रम्प यांनी याला ‘राजकीय वाटाघाटी’ म्हटले आणि आंतरराष्ट्रीय करारांमध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दबावतंत्रांचा अवलंब करतात अशी कबुली दिली. एखादा कठोर निर्णयाची घोषणा केल्यानंतर तो निर्णय मागे घेण्याची किंवा त्यावर स्थगिती येण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. त्यामुळे ट्रम्प यांच्या कोणत्यांही इशाऱ्यांना न घाबरता आणि त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी वाट बघा कारण चहूबाजूंनी कोंडी झाली किंवा टीकेची झोड उठण्यास सुरूवात झाली की ट्रम्प यू-टर्न घेणारचं हेच टेरिफ वॉर वरून लक्षात आले असून, सातत्याने बदलणाऱ्या भूमिकांमुळे आता ट्रम्प यांना TACO नाव पडलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube