अमेरिका आणि चीन यांच्यातील Tariff War संपले, कुणी घेतली माघार?

अमेरिका आणि चीन यांच्यातील Tariff War संपले, कुणी घेतली माघार?

Tariff War News : चीन आणिमेरिका (America) यांच्यामध्ये अखेर टॅरिफ कमी करण्यासाठी एक करार (US-China Tariff Agreement) झाला. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार, पुढील ९० दिवसांसाठी टॅरिफ शुल्क ११५% ने कमी केले. दोन दिवसांच्या चर्चेनंतर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे हा करार फायनल झाला. त्यानंतर आज (१२ मे) रोजी संयुक्त निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली.

राजकारणातील कट्टर विरोधक एकाच फ्रेममध्ये; सतेज पाटील अन् महाडिकांमध्ये ‘या’ विषयात एकमत 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापार युद्ध पेटले होते. मात्र, आता या दोन्ही देशांमध्ये व्यापार कर कमी करण्याबाबत सहमती झाली. अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १४५% कर लादला होता. तर आता या करारानंतर, हे शुल्क ९० दिवसांसाठी ३०% पर्यंत कमी केलं जाईल. त्याच वेळी, चीनने अमेरिकन वस्तूंवर १२५% शुल्क लादले होते, जे या करारानंतर फक्त १०% पर्यंत कमी केले जाईल. जिनेव्हा येथे चिनी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर, अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी याबाबत माध्यमांना माहिती सांगितली.

बेझंट म्हणाले की, दोन्ही देशांनी लादलेल्या कर ९० दिवसांसाठी स्थगित करण्याचे मान्य केले.  यामुळे शुल्क ११५ टक्क्यांनी कमी होईल. दोन्ही देशांनी त्यांचे राष्ट्रीय हितसंबंध चांगल्या प्रकारे जोपासले आहेत, असं ते म्हणाले.

पाकिस्तानचे ड्रोन हल्ले अन् अचानक लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीचा उल्लेख 

यापूर्वी व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी केलं होतं, त्यामध्ये बेझंट यांनी चीनसोबतच्या चर्चा यशस्वी झाल्याचं सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, मला हे सांगताना आनंद होत आहे की अमेरिका आणि चीनमध्ये व्यापाराबाबत चर्चा झाली असून ती चर्चा यशस्वी झाली.

तर अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर म्हणाले की, या करारामुळे १.२ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स (९८.४ लाख कोटी रुपये) ची व्यापार तूट कमी होण्यास मदत होईल.

दरम्यान, एकमेकांवर शुल्क लादल्यानंतर, दोन्ही देश पहिल्यांदाच समोरासमोर बसून बोलत होते. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर कर लादण्यास सुरुवात केली होती. विशेषतः, ट्रम्प यांनी चीनवर मोठ्या प्रमाणात कर लादले. त्यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या अनेक चिनी वस्तूंवर लादलेले शुल्क १४५ टक्क्यांपर्यंत वाढवले होते. यानंतर चीननेही अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के कर लादला होता. याचा मोठा फटका दोन्ही देशांना बसला होता. या करांमुळे जवळपास ६०० अब्ज डॉलर्सचा दोन्ही बाजूंचा व्यापार ठप्प झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube