Download App

नागरिकांचं स्वप्न साकार! राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्डांचा महापालिकेत समावेश?

मुंबई : राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून एकूण सात कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. अहमदनगर, पुणे, औरंगाबाद व नागपूर, नाशिक येथील महापालिका आयुक्तांना आज आदेश देण्यात आलेले आहेत.

जन्माची अद्दल घडविणार; अजितदादांच्या इशाऱ्यानंतर माजी आमदाराच्या पोटात गोळा

या आदेशानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डांचे महापालिकेत विलिनीकरण करता येईल का? विलिनीकरण केल्यास महापालिकेची प्रभाग रचना, लोकसंख्या आदीबाबींत काय बदल होतील. यासंदर्भातील अहवाल देण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

Kunal Tilak चंद्रकांत पाटलांवर नाराज… म्हणाले माझ्या आईच्या कामाला दुर्लक्षित करणे बरोबर नाही!

केंद्र सरकारच्या अधिसूचनेप्रमाणे राज्य सरकारकडे अद्याप कॅन्टोन्मेंट बोर्डांचे अहवाल सादर झालेले नसून हे अहवाल शासन दरबारी सादर करण्याबाबत सातही जिल्ह्यातील महापालिकांच्या आयुक्तांना आदेश दिले आहेत.

या अहवालामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाची हद्द, लोकसंख्या, त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट हद्द महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेची हद्द आणि लोकसंख्या किती होईल? याबाबतची माहिती अहवालामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे राज्य सरकारने मागितली आहे.

Marriage : भाच्याच्या लग्नात मामा कुबेर, सोनं, चांदी, जमीन देत केला आठ कोटींचा खर्च

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून देशातल्या 56 कॅन्टोन्मेंट बोर्डा्च्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. येत्या 30 एप्रिल रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी मतदान पार पडणार होतं. यामध्ये पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर कॅन्टोन्मेंट बोर्डाचाही समावेश होता.

Bilkis Bano Case आरोपींच्या सुटकेवरून सर्वोच्च न्यायालायाने गुजरात सरकारला फटकारले

मात्र, 17 मार्च रोजी अचानक निवडणुका रद्द करण्यात आल्याची अधिसूचना संरक्षण खात्याकडून जाहीर करण्यात आली होती. एकीकडे निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार सुरु होती. तर दुसरीकडे अचानक निवडणुका रद्द झाल्याने इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला.

निवडणुका रद्द झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाचा महापालिकेत समावेश होणार असल्याच्या कारणानेच रद्द झाल्याचा सून नागिरकांमध्ये सुरु होता. अखेर कॅन्टो्न्मेंट बोर्डाचा महापालिकामध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

Tags

follow us