Download App

नेवाशात ज्ञानेश्वरसृष्टी तर प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारणार; मंत्री विखेंची माहिती

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास करत असताना जिल्ह्यातील रोजगार निर्मितीमध्ये अधिक प्रमाणात वाढ करतानाच जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटन वाढविण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मारक उभरण्याचा निर्णय जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन आणि पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.

जायकवाडीला नगरमधून पाणी नाहीच; डीपीडीसीच्या बैठकीत ठराव, सर्वपक्षीय नेत्यांचा एकच सूर 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितची बैठक आयोजित करण्यात आले होती. यावेळी विखे पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात 753.52 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मार्च, 2023 अखेर 100 टक्के निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला. सन 2023-24 या चालु वित्तीय वर्षामध्ये शासनाने 739.78 कोटी रुपयांची कमाल निधी मर्यादा कळविली होती. मात्र, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधीधी मागणी करण्यात आली होती. ती मागणी मान्य करत 817 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. त्यापैकी 534.2 कोटी रुपयांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला. त्यातील 159.13 कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी वितरित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री विखेंनी दिली.

केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, 450 रुपयांत गॅस, फ्रीमध्ये स्कुटी; BJP च्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस 

ते म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात अनेक धार्मिकस्थळे व साहासी पर्यटनाची स्थळे असून या ठिकाणी राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. साहासी व धार्मिक पर्यटनाला अधिक प्रमाणात चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी या दोनही पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येईल. नेवासा येथेही राज्यासह इतर ठिकाणांहून भाविकांची मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी ज्ञानेश्वरसृष्टी उभारण्याच्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात यावा. यासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं विखे पाटील यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येणार आहे. त्यासाठी पुतळा उभारणीसाठी आवश्यक असलेली जागेचा अहवाल येत्या आठ दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा विस्तार होऊन या ठिकाणी अनेक चांगले उद्योग यावेत व रोजगार निर्मितीमध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. अहमदनगर येथील औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी 300 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शेतीमहामंडळाची 502 दोन एकर जमीन एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आली आहे. तसेच सुपा येथील एमआयडीसीच्या विस्तारासाठी भुसंपादनाची प्रक्रियाही सुरु असल्याचे सांगत जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीसाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

जिल्हा परिषद शाळांना अखंडितपणे विद्युत पुरवठा व्हावा यासाठी सर्व शाळांना सोलरद्वारे वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे. यासाठी आवश्यक असणारा निधी त्या त्या मतदारसंघातील आमदारांकडून 25 लक्ष रुपये व उर्वरित निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags

follow us