अहमदनगर – राज्यात यंदा कमी पाऊस झाल्यानं अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं खरीप हंगामासाठी पहिल्या टप्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar) यंदा अल्प पाऊस झाला. मात्र, नगर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी सर्व निकषात बसत असतानाही सबंधित कंपनीच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे जिल्हा दुष्काळी उपाययोजनांपासून वंचित राहिल्याचा आरोप आमदार निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) केला. यावरून त्यांनी महूसलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचं नाव न घेता त्यांच्यावर टोलेबाजी केली.
एकनाथ खडसेंना ह्रदयविकाराचा झटका; तात्काळ एअर ॲम्ब्युलन्स पाठवण्याचे CM शिंदेंचे आदेश
राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चाळीस तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यास मान्यता दिली. मात्र, नगर जिल्हा यातून वगळला. मात्र, आपण दुष्काळाच्या प्रश्नावरून राजकारण करणार नाही, तर जिल्ह्यातील जे काही प्रमुख नेतेमंडळी आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावे, असं म्हणतच लंकेंनी नामोउल्लेख टाळत मंत्री विखेंना टोला लगावला आहे.
नगर जिल्ह्यातील एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला नसल्याने निलेश लंके हे आक्रमक झाले आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाने अल्प प्रतिसाद दिला असल्याने जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र नगर जिल्ह्याचा यामध्ये समावेश नसल्याने यावरून आमदार लंके यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.
यावर बोलताना लंके म्हणाले, दुष्काळाच्या प्रश्नावरून मला राजकारण करायचे नाही आहे. मात्र जिल्ह्यातील जे काही प्रमुख नेतेमंडळी आहे त्यांनी प्रश्नाकडे लक्ष घालायला हवे होते. मात्र त्यांनी लक्ष घातलं नाही. त्यामुळं आपण दुष्काळग्रस्त यादीत आलो नाही. आता त्यांना दोष देण्याऐवजी यामधून कसा मार्ग काढता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल , याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे असे यावेळी बोलताना लंके म्हणाले.
जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त म्हणून करण्यात यावा यासाठी महसूलमंत्री विखे तसेच खासदार यांच्याकडून प्रयत्न केला जात नाही का? असा सवाल विचारण्यात आले असता लंके म्हणाले की, त्यांना हा विषय महत्वाचा वाटला नसेल. प्रत्येकाचं एक मत असतं. कोणाला कोणती गोष्ट महत्वाची वाटते, त्यावर ती व्यक्ती आपलं मत देत असते. कदाचित त्यांना हा प्रश्न महत्वाचा वाटला नसेल, अशा शब्दात लंके यांनी विखेंना शाब्दिक टोला लगावला आहे.
प्रशासनाला दिला इशारा
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नगर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्यानं आमदार लंके आक्रमक झाले. सर्व निकषात बसत असतांनाही संबंधित कंपनीच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळं जिल्हा दुष्काळी उपायययोजनांपासून वंचित राहिला असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, नगर जिल्ह्याला देखील दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा याबाबतची मागणी मी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत मी मुख्यमत्र्यांना पत्र व्यवहार केला आहे. मात्र याबाबत काही निर्णय झाला नाही तर मी यासाठी थेट कोर्टाची देखील पायरी चढणार असल्याचा इशारा यावेळी आमदार निलेश लंके यांनी दिला आहे.