Ahilyanagar Assembly Constituency : जिल्ह्यात बाराही विधानसभा मतदारसंघांमध्ये आज माघारी तर शेवट झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe Patil) यांच्या विरोधामध्ये भाजपाचे राजेंद्र पिपाडा यांनी अर्ज कायम ठेवला आहे, तर दुसरीकडे ८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी आपले अर्ज माघारी न घेतल्यामुळे जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये बंडखोरी ही दोन्ही पक्षांकडून झाली असल्याचं चित्र दिसून येत आहे. तर ४ मतदारसंघांमध्ये फक्त सरळ लढत होणार आहे. नगर जिल्ह्यात बारापैकी आठ मतदारसंघात बंडखोरी झालेली असून यामध्ये चार मतदारसंघात सरळ लढती आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारणाला तसेच अंतर्गत हेवेदावे असलेल्या ठिकाणी बंडखोरी थोपवण्यात अपयश आले आहे.
मोठी बातमी! केरळ, पंजाब आणि युपीची पोटनिवडणूक पुढे ढकलली; ‘या’ तारखेला होणार मतदान, कारण…
विधानसभा निवडणुकीसाठी 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून माघारी घेण्यासाठी अनेकांना विनंती करण्यात येत होती. वरिष्ठ पातळीवरून सुद्धा महायुतीमध्ये बंडखोरी होणार नाही, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बंडखोरी झाल्याचे चिन्ह काही मतदारसंघांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे अनेकांचे अर्ज कायम राहिल्यामुळे आता उमेदवारांच्या पुढे मोठे डोकेदुखी झालीयं. नगर जिल्ह्यामध्ये काही मतदारसंघांमध्ये चौरंगी लढती तर काही मतदारसंघांत तिरंगी लढत होणार असल्यामुळे आता प्रचार कशा पद्धतीने केला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदेंना ईडीची भीती दाखवून पक्ष फोडला, ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप…
नगर शहर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे शशिकांत गाडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला असून या मतदारसंघांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बंडखोरी केलीयं. त्या पाठोपाठ शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याबरोबर भाजपाचे बंडखोर राजेंद्र पिपाडा यांनी आपला उमेदवारी अर्ज तसाच ठेवला आहे, पण ममता पिपाडा अपक्ष अर्ज हा मागे घेण्यात आलेला आहे. शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे, राजेंद्र पिपाडा यांच्यासह प्रभावती घोगरे यांच्यात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; IPLमधूनही माघार
श्रीगोंद्यात दोन्ही पक्षांत बंडखोरी…
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी दोन्ही पक्षांमध्ये झालेली आहे या ठिकाणी भाजपाच्या सुवर्णा पाचपुते या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या दुसरीकडे महाविकास आघाडीचे माजी आमदार राहुल जगताप हे बंडखोर म्हणून निवडणूक लढवत आहे त्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे या ठिकाणी माजी आमदार विजय औटी व माजी नगराध्यक्ष विजय औटी या दोघांनीही आपला उमेदवारी अर्ज हा कायम ठेवला आहे तर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या सुद्धा उमेदवारी अर्ज हा ठेवला आहे. तर या ठिकाणी अजित पवार गटाचे काशिनाथ दाते व खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहे त्यामुळे पारनेरमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळत आहे.
नेवासा-अकोल्यातही बंडखोरी…
नेवासा मतदारसंघांमध्ये भाजपाने बंडखोरी केली आहे. यामध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज ठेवला आहे. या मतदार संघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख व एकनाथ शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे यांनी उमेदवारी अर्ज ठेवल्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत दिसून येणार आहे, तर अकोले मतदारसंघांमध्ये माजी मंत्री पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांनी माघार न घेतल्यामुळे या ठिकाणी सुद्धा बंडखोरी झालीयं. या ठिकाणी अकोल्यामध्ये शरद पवार पक्षाकडून अमित भांगरे यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात महायुतीने डॉ. किरण लहामटे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिलेली आहे. मात्र, या ठिकाणी भाजपाचे वैभव पिचड यांनी बंडखोरी केलीयं.
पाथर्डी-शेवगावात चंद्रशेखर घुलेंच्या अर्जामुळे चौरंगी लढत…
पाथर्डी-शेवगाव मतदारसंघामध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत आहे. भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे, शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे हर्षदा काकडे व अपक्ष म्हणून चंद्रशेखर घुले यांच्यामध्ये आता चौरंगी लढत होणार आहे. कर्जत जामखेड मतदार संघामध्ये आमदार रोहित पवार विरुद्ध माजी मंत्री व भाजपाचे विद्यमान आमदार राम शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे तर संगमनेर मतदारसंघांमध्ये महसूल मंत्री राहिलेले विद्यमान आमदार काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विरुद्ध महायुतीचे अमोल खताळ अशी लढत होणार आहे. राहुरी मतदारसंघांमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे विरुद्ध भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये लढत होणार आहे.
दरम्यान, श्रीरामपूर मतदारसंघांमध्ये हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा बंडखोरी झाली आहे. या ठिकाणी माजी आमदार लहू कानडे यांनी बंडखोरी केली आहे. या ठिकाणीं आघाडीकडून हेमंत ओगले तर महायुतीकडून भाऊसाहेब कांबळे हे मैदानात आहे तर कोपरगाव मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून संदीप वर्पे यांची सरळ लढत होणार आहे. तर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेले कोल्हे कुटुंबियांची भूमिका कोपरगावमध्ये निर्णायक ठरणार आहे.