एकनाथ शिंदेंना ईडीची भीती दाखवून पक्ष फोडला, ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप…

  • Written By: Published:
एकनाथ शिंदेंना ईडीची भीती दाखवून पक्ष फोडला,  ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप…

Omraje Nimbalkar On Eknath Shinde : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha Election) अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले.

Assembly Election: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात ? नवाब मलिकांनी टाकला मोठा बॉम्ब 

एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाला ईडीने ताब्यात घेतल्यानंतर भाजपकडून शिंदे यांच्यावर दबाव आणला जात होता. ईडीची भीती दाखवून शिवसेना पक्ष फोडला, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर आता उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली. त्यानुसार, आज धाराशिवमध्ये महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचाराचा शुभारभ झाला. यावेळी बोलतांना ओमराजे निंबाळकरांनी भापजसह एकनाथ शिंदेंवर टीका केली. ते म्हणाले, शिवसेना पक्ष इतक्या सहजासहजी फुटला नाही, एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाला ईडीने ताब्यात घेतल्यानंतर भाजपकडून शिंदे यांच्यावर दबाव आणला जात होता. शिवसेना पक्ष सोडून येतो की जेलात जातो, त्यामुळं पक्ष फोडून एकनाथ शिंदेंसोबत हे आमदार गेले. ईडीची भीती दाखवून शिवसेना पक्ष फोडल, असं ओमराजे म्हणाले.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण होणार लखपती, मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान, म्हणाले, ‘आता दर महिन्याला…’ 

राजकारण नासवून टाकायचं काम भाजपने केलं
पुढं ते म्हणाले, तसेच अजित पवार यांचा 70 हजार कोटींचा घोटाळा काढला अन् अजित पवार सातव्याच दिवशी यांच्या मंत्रिमंडळात दाखल झाल्याचं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं. भाजप हे कटकारस्थानी असून महाराष्ट्राील राजकारण नासवून टाकायचं काम भाजपने केलं. शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं, अशी टीका ओमराज निंबाळकर यांनी केली.

गद्दारीत सहभागी झालो नाही
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान प्रत्यक्षात लागू होत नाही. गद्दारीत सहभागी झालो नाही म्हणून मतदारसंघातील काम अडवून ठेवली. हे सर्व प्रश्न घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत, असं कैलास पाटील म्हणाले.

दरम्यान, ओमराजे निंबाळकरांनी केलेल्या टीकला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप काय प्रत्युत्तर देतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube