Download App

कोपरगावातील सबस्टेशन शहा सबस्टेशनला जोडण्याचे काम पूर्ण करा; आ. काळेंच्या सूचना

सिन्नर तालुक्यातील शहा सबस्टेशनला कोपरगाव मतदारसंघातील कोळपेवाडी, चास, नळी व पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे काम सुरू आहे.

Kopargaon News : माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यात आलेल्या १३२ केव्हीए सबस्टेशनला कोपरगाव मतदार संघातील सबस्टेशन जलद गतीने जोडा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.

कोपरगाव मतदारसंघातील २२० केव्हीएचे सबस्टेशन ओव्हरलोड असल्यामुळे वीज पुरवठ्यात खंड पडून त्याचा त्रास शेतकऱ्यांना, वीज ग्राहकांना व छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाला होत आहे. त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात १३२ केव्हीएचे सबस्टेशन उभारण्यास मंजुरी मिळविली होती परंतु हे सबस्टेशन दुर्दैवाने सिन्नर तालुक्यात शहा येथे उभारण्यात आले.

या सबस्टेशनला कोपरगाव मतदारसंघातील ओव्हरलोड सबस्टेशन जोडले जावे व २५ एमव्हीए क्षमतेचे ट्रांसफार्मर ५० एमव्हीए क्षमतेचे करावे यासाठी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व आमदार आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरू होता.

निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलाव लघू बंधारे भरून द्या; आमदार आशुतोष काळेंच्या सूचना

या पाठपुराव्यातून २५ एमव्हीए क्षमतेचे ट्रांसफार्मर ५० एमव्हीए क्षमतेचे करण्यास मंजुरी मिळाली आहे. शहा सबस्टेशनला कोपरगाव मतदारसंघातील कोळपेवाडी, चास, नळी व पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे काम सुरू आहे. सदरचे काम तातडीने पूर्ण करून कोपरगाव मतदारसंघातील नियोजित सबस्टेशन या सबस्टेशनला जोडून शेतकऱ्यांना वीज द्या.

शहा येथे १३२ केव्हीएचे सबस्टेशन कार्यान्वित होवून जवळपास वर्षभराचा कालावधी होत आला आहे. या सबस्टेशनला कोपरगाव तालुक्यातील सबस्टेशन जोडण्याच्या सुरू असलेल्या कामातील अडचणी दूर करून त्या कामांना गती द्या. शहा सबस्टेशन वरून वीज वाहिन्या सिन्नर तालुक्यातील पाथरे गावापर्यंत आल्या आहेत या वीज वाहिन्या आठ दिवसांत पोहेगाव सबस्टेशनला जोडा तसेच ज्या ठेकेदारांनी शहा सबस्टेशनच्या २५ एमव्हीए क्षमतेचे ट्रांसफार्मर ५० एमव्हीए क्षमतेचे करण्याचे काम घेतले आहे ते काम देखील जलद गतीने काम पूर्ण करा अशा सूचना आ. काळे यांनी कार्यकारी अभियंता थोरात व संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत.

पोहेगाव पोलीस दुरुक्षेत्र कार्यालय पूर्ववत सुरु करा, आ.आशुतोष काळेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना

follow us