अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराला थाटात सुरुवात, शहरात जोरदार प्रचारफेरी

Ahilyanagar Mahanagarpalika election 2026: शहराचे आराध्यदैवत माळीवाडा गणपती मंदिरात श्री गणेशाची आरती करून प्रचाराची औपचारिक सुरुवात.

Ahilayanagar Mahpalika Sangram Jagtap

Ahilayanagar Mahpalika Sangram Jagtap

Ahilyanagar Mahanagarpalika election 2026: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या (Ahilyanagar Mahanagarpalika election 2026) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला. या प्रचारफेरीस आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap), आमदार विक्रम पाचपुते, पक्षाचे सरचिटणीस विजय चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

श्रुती राम वाकडकर यांचा सोसायटीधारकांशी झंझावाती गाठी-भेटींचा दौरा; नागरिकांच्या प्रश्नांना थेट भिडणारा संवाद

यावेळी अहिल्यानगर शहराचे आराध्यदैवत माळीवाडा गणपती मंदिरात श्री गणेशाची आरती करून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत, अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

यासोबतच महायुतीच्या माध्यमातून शहरात पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, रोजगार आणि नागरी सेवांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच, अहिल्यानगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही निवडणूक निर्णायक ठरेल, असा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

Exit mobile version