डोंबिवलीचे नगरसेवक ते भाजप प्रदेशाध्यक्ष…….रविंद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास

Ravindra chavan bjp state president: भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांची आज नियुक्ती झाली. पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळालीय. भारतीय जनता युवा मोर्चा ( bjp) कल्याण जिल्हा उपाध्यक्ष ते नगरसेवक, आमदार, मंत्री, पालकमंत्री, भाजपचे सरचिटणीस, कार्याध्यक्ष ते आता प्रदेशाध्यक्ष असा चव्हाण यांचा राजकीय प्रवास सगळ्यांना थक्क करणारा आहे.
महाविद्यालयीन जीवनापासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपचा प्रभाव
चव्हाण यांचे संपूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण हे मुंबईत झाले. बारावीपर्यंत नियमित शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून पुढील शिक्षण घेतले. त्यांच्यावर महाविद्यालयीन जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणीचा प्रभाव होता. चव्हाण यांच्या वडिलांनी भांडुप सोडून डोंबिवलीला राहण्याचा निर्णय घेतला. तोच निर्णय रविंद्र चव्हाण यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारा ठरला. त्यांनी डोंबिवलीत युवा मोर्चाचे काम सुरू करीत राजकारणाचे धडे गिरविण्यास सुरुवात झाली. भारतीय युवा मोर्चाचे काम करताना रविंद्र चव्हाण यांनी 2002 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली.
डोंबिवलीचे नगरसेवक ते सार्वजनिक बांधकाममंत्री
रविंद्र चव्हाण हे 2005 मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर 2007 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. महानगरपालिकेतील चांगल्या कामामुळे पक्षाने त्यांना 2009 ला डोंबिवली नवीन विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरविले. त्यांनी मनसेच्या उमेदवाराचा मोठा फरकाने पराभव करत विजय मिळविला. चव्हाण हे 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग चार वेळा आमदार झाले. त्यांना 2016 मध्ये राज्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात पहिल्यांदा संधी दिली. 2018 मध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदासह पालघरचे पालकमंत्रिपदही त्यांनी भूषविले. तर कोकण, ठाणे जिल्ह्यात भाजपचे ताकद वाढविली. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत कोकण प्रदेशात भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणले. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटल्या जात असलेल्या ठाणे जिल्ह्यात सलग दोन निवडणुकीत सर्वाधिक नऊ आमदार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली. तर महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेटमंत्रिपद मिळाले. त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी मिळाली.
मंत्री म्हणून अनेक उल्लेखनीय कामे
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले. त्यात आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी केंद्र, तृतीयपथियांना शिधापत्रिका, मराठवडा व विदर्भातील 14 जिल्ह्यांतील सर्व शेतखर्यांना अन्नधान्याएेवजी दरमहा 150 रुपये इतकी थेट रक्कम. रेशन आपल्या दारी योजना, अवघ्या एक वर्षात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे डिजिटलायझेशन, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत खरेदी.
पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पायाभूत विकास
पालघरचे पालकमंत्री म्हणून काम पाहता रविंद्र चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याच रस्त्यांचे जाळे निर्माण केले. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेतंर्गत 6 हजार 868 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी 5 हजार कोटींचा निधी देत रस्ते निर्माण केला. तसेच पर्यटनाला चालणासाठी उपायजोना राबविल्या. त्याच बरोबर आदिवाशी शाळांचा विकास करत. तेथे मूलभूत सुविधा निर्माण केल्या. काँक्रिट बंधारे अनेक भागात उभारले.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाचा विकास केला. त्यात टेलिमेडिसन सारखा एक अभिनव उपक्रम होता. तसेच कातकरी कुटुंबांना ओसरगाव येथील स्वतःच्या मालकीची जमिन घरे बांधण्यासाठी दिली. तसे कोकणातील आंगणेश्वर, कुणकेश्वर अशा देवस्थानांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करत तेथे सुविधा निर्माण केल्या. कोकणातील 17 प्रमुख राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 66.35 कोटी किंमतीची तरदूत करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाममंत्री जबरदस्त कामे
9 ऑगस्ट 2022 ते 26 नोव्हेंबर 2024 या कार्यकाळात ते सार्वजनिक बांधकाममंत्री होते. त्या काळात राज्यभरात सुमारे 92 हजार कोटींचे कामे केली. त्यात मुंबई-गोवा महामार्गाचे काम मार्गी लावण्यात चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. तसेच अयोध्यात महाराष्ट्र भक्त निवास, काश्मीरात महाराष्ट्र भवन उभारण्याचे निर्णय त्यांनी घेतले.