Download App

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल

प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणारे शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (MLA Sangram Jagtap) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

MLA Sangram Jagtap News : अहिल्यानगर शहराच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणारे शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (MLA Sangram Jagtap) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाइलवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर कोतवाली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाइलवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. या मेसेजमध्ये ‘संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा’ असा मजकूर लिहिलेला होता. संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. हिंदू समाजाची बाजू आमदार जगताप अतिशय हिरीरीने मांडत आहेत. अशातच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

“एखाद्याचं वक्तव्य ही पक्षाची भूमिका नाही”, अजितदादांनी सांगितलं संग्राम जगतापांच्या भेटीत काय घडलं?

या धमकीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सायबर शाखेची मदत घेतली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक फौजदार अमिना शेख करत आहेत. दरम्यान, आमदार जगताप यांना धमकी देण्यात आल्याने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

follow us