Download App

“कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती अॅग्रो नाही, राम शिंदेंमुळे..”, आ. जगतापांचा रोहित पवारांना खोचक टोला

Sangram Jagtap replies Rohit Pawar : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वाद संपता संपेना. दररोज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाचा नवा अंक पहायला मिळत आहे. अहिल्यानगर शहरात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्यावतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याच्या दिवशी मल्ल आणि पंचांचा वाद झाला होता. त्यामुळे ही महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात चांगलीच गाजली. त्यानंतर या कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून विरोधकांकडून आरोप करण्यास सुरुवात झाली. आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देताना ही राजकीय कुस्ती असल्याचे म्हटले होते.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा कर्जत जामखेड मध्ये भरवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने त्याला मान्यता देत 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड येथे आयोजन करण्याबाबत मान्यता दिल्याचे समजते. त्यानंतर काल पुण्यात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत कुस्ती स्पर्धेच्या तारखा जाहीर करत नवा डाव टाकला.

जिहादींच्या बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करा; आ. संग्राम जगतापांचा मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या

विदर्भ केसरी माजी खासदार रामदासजी तडस यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कुस्तीचे काम सातत्याने सूरू आहे. यावर्षी 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आली होती. उत्कृष्ट नियोजन आणि सर्वाधिक मल्ल नोंदणी या स्पर्धेत झाली आहे. याबाबत कोणी वल्गना करत आहेत ते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची स्पर्धेला उपस्थिती झोंबल्याने आता वल्गना करत आहेत.

रोहित पवारांना चार दिवस कुस्ती पाहायला वेळ मिळाला नाही, चार दिवस काय झाले हे पाहिले नाही आणि आता कुस्ती स्पर्धा राजकीय झाल्याचे बोलत आहेत. कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचा अधिकार आयोजकांना आहे ही बारामती ॲग्रो फर्म किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. आम्ही जनतेत काम करणारे लोकप्रतिनिधी असून आम्ही जिल्ह्यातील जनतेत असलेल्या व्यक्तींना तिथे बोलावले होते. रामदास तडस यांनी सांगितले आहे की ही जी स्पर्धा आहे ती अधिकृत नाही त्यामुळे त्यावर जास्त भाष्य नको असे म्हणत आमदार संग्राम जगताप यांनी रोहित पवारांना जोरदार टोला लगावला आहे.

कर्जतमध्ये रंगणार अजिंक्यपद महाराष्ट्र केसरीचा थरार! जिल्हा तालीम संघाच्यावतीने रोहित पवारांना पत्र

follow us