Download App

आशुतोष काळे सर्वाधिक, रोहित पवार सर्वात कमी मतांनी विजयी; लंघे, लहामटेंनाही फुटला घाम…

कर्जत जामखेड मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत लढत रंगली. या लढतीत विद्यमान आमदार रोहित पवार यांनी पुन्हा बाजी मारली.

Ahilyanagar Election : विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत (Elections 2024) विजय मिळवला. तब्बल 132 जागा जिंकून भाजप राज्यातील (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिंदे सेना आणि अजित पवार गटाने तितकीच दमदार कामगिरी केली. दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीची (MVA) पुरती दाणादाण उडाली. अहिल्यानगर जिल्ह्यातही महायुतीची (Ahilyanagar News) जादू चालली. जिल्ह्यातील तब्बल 10 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले. तर आघाडीला कशातरी दोन जागा जिंकता आल्या.

जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत लढत रंगली. अखेर या अटीतटीच्या लढतीत विद्यमान आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) पुन्हा बाजी मारली. जवळपास 1243 मतांनी भाजपचे राम शिंदे यांचा (Ram Shinde) पराभव केला. जिल्ह्यातील लढतींचं चित्र पाहिलं तर श्रीगोंदे, राहुरी, शेवगाव-पाथर्डी, शिर्डी या मतदारसंघांत भाजपने बाजी मारली. अहिल्यानगर शहर, कोपरगाव, अकोले, पारनेर या मतदारसंघांत अजित पवार राष्ट्रवादी तसेच नेवासा, संगमनेर मतदारसंघांत शिंदे सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.

अजित पवारांच्या कटाचा मी बळी ठरलो; भाजपने गांभीर्यानं घ्यावं, राम शिंदेंनी सांगितलं पराभवाचं कारण

जिल्ह्यात कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे सर्वाधिक मतांनी तर कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार सर्वात कमी मतांनी विजयी झाले आहेत. किरण लहामटे, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते हे आमदार सुद्धा अतिशय कमी फरकाने विजयी झाले आहेत. अहमदनगर शहर मतदारसंघांत अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांनी 1 लाख 18 हजार 636 तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अभिषेक कळमकर यांना 79 हजार 18 मते मिळाली. अकोलेमध्ये किरण लहामटे यांना 73 हजार 958 तर शरद पवार गटाचे अमित भांगरे यांना 68 हजार 402 मते मिळाली.

कर्जत जामखेड मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत पाहण्यास मिळाली. या लढतीच्या निकालावरून वादही झाले. मात्र अखेर रोहित पवार यांना विजयी घोषित करण्यात आले. शरद पवार गटाचे रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 तर भाजपचे राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली. शिर्डी मतदारसंघात भाजपचे राधाकृष्ण विखे यांना 1 लाख 44 हजार 778 तर काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांना 74 हजार 496 मते मिळाली.

राहुरी मतदारसंघात भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांनी विजय मिळवला. त्यांना एकूण 1 लाख 35 हजार 859 तर शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांना 1 लाख 1 हजार 372 मते मिळाली. संगमनेर मध्ये यंदा मोठा उलटफेर पाहण्यास मिळाला. काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना (Balasaheb Thorat) पराभवाचा धक्का बसला. शिंदेसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी थोरात यांचा पराभव केला. अमोल खताळ यांना 1 लाख 12 हजार 386 तर बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 1 हजार 826 इतकी मते मिळाली.

कोपरगावमध्ये महायुतीचा गुलाल! आशुतोष काळे यांचा दणक्यात दुसऱ्यांदा विजय

उमेदवार आणि त्यांचे मताधिक्य

आशुतोष काळे (राष्ट्रवादी अजित पवार) :  1,24,626

राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) :  70,282

संग्राम जगताप (राष्ट्रवादी अजित पवार) : 39, 618

विक्रम पाचपुते (भाजप) :  37, 156

शिवाजीराव कर्डिले (भाजप) :  34, 487

मोनिका राजळे (भाजप) :  19, 043

हेमंत ओगले (काँग्रेस) :  13, 373

अमोल खताळ (शिवसेना एकनाथ शिंदे) :  10, 560

किरण लहामटे (राष्ट्रवादी अजित पवार) :  5, 556

विठ्ठलराव लंघे (शिवसेना एकनाथ शिंदे) : 4, 021

काशिनाथ दाते (राष्ट्रवादी अजित पवार) : 1, 526

रोहित पवार (राष्ट्रवादी शरद पवार) : 1, 243

follow us