Download App

Ahilyanagar : बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, 27 लाखांच्या खोट्या नोटा जप्त, अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई…

नगर तालुका पोलिसांनी बनावट चलनी नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून तब्बल 27 लाख 90 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा जप्त

  • Written By: Last Updated:

अहिल्यानगर : नगर तालुका पोलिसांनी (Ahilyanagar Police) बनावट चलनी नोटांच्या (Counterfeit Notes) रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून तब्बल 27 लाख 90 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये यावेळी संबंधित ठिकाणाहून छपाई आणि इतर साहित्य असा एकूण दोन कोटी 16 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत नऊ आरोपींविरोधात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयटीवाल्यांची भूमिका ते शांतपणे ऐकतात.., हिंजवडी सरपंचांचा उपमुखमंत्री अजित पवारांवर थेट घाव 

याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि प्रल्हाद गिते हे नगर तालुका पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, दोन इसम एक काळ्या रंगाचे महिंद्रा थार गाडीमध्ये फिरत असून त्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा आहेत. त्यावर गिते यांनी त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांना सोबत घेवून आंबीलवाडी शिवारात जावून खात्री केल्यावर तेथे दोन संशयीत इसम एक महिंद्रा थार गाडीमध्ये फिरताना दिसले.

“चंद्रकांतदादा पुणेकर वाटलेच नाहीत, देवेंद्रजी लक्ष घाला”, अजितदादांचा टोला अन् फडणवीसांचीही गुगली 

गिते आणि पथकातील अंमलदारांनी सदरचे इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) निखील शिवाजी गांगर्डे, वय २७ रा. कुंभळी ता कर्जत जि. अहिल्यानगर २) सोमनाथ माणिक शिंदे, वय २५ रा. तपोवन रोड जि. अहिल्यानगर असे सांगितले. त्यांच्याकडे सखोल चोकशी करुन गाडीची झडती घेतील असता त्यांचकडे 80 हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा सापडल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याच्या अधिक तपास केला असता बनावट नोटांमध्ये मराठवाडा कनेक्शन असल्याचंही समोर आलं. बीड जिल्ह्यातुन आरोपी  ३) प्रदिप संजय कापरे वय २८ रा. शिरुर कासार जि. बीड तसेच संभाजीनगरमधून आरोपी नामे ४) मंगेश पंढरी शिरसाठ वय ४० रा .शिवाजी नगर ता.जि. छत्रपती संभाजी नगर ५) विनोद दामोधर अरबट वय ५३ रा. सातारा परिसर ता.जि. छत्रपती संभाजी नगर ६) आकाश प्रकाश बनसोडे वय २७ रा. निसर्ग कॉलनी पेठेनगर ता.जि. छत्रपती संभाजी नगर ७) अनिल सुधाकर पवार वय ३४ रा. ५६ नंबर गेट मुकुंदनगर ता.जि. छत्रपती संभाजी नगर ८) अंबादास रामभाऊ ससाणे रा. शहर टाकळी ता. शेवगाव जि. अहिल्यानगर (फरार) यांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 59 लाख ५० हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप करण्यात आल्या आहेत.

“चंद्रकांतदादा पुणेकर वाटलेच नाहीत, देवेंद्रजी लक्ष घाला”, अजितदादांचा टोला अन् फडणवीसांचीही गुगली 

बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त..
दरम्यान, आरोपींकडून 2 कोटी 16 लाख रुपयांचं बनावट नोटा तयार करण्यासाठीचे कागद व शाई इत्यादी प्रकारचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर तसेच अमोल भारती सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. नगर ग्रामीण विभाग यांचे सुचनानुसार प्रल्हाद गिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोसई भरत धुमाळ तसेच इतर कर्मचारी यांचे पथकाने केली आहे.

follow us