अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित थरार! मध्यरात्री एका जणावर जीवघेणा हल्ला, 15 जणांच्या टोळीने घेरून केले वार

Ahilyanagar Crime News Deadly Attack On Man : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar News) नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक कामरगाव शिवारात, एका जुन्या कोर्ट प्रकरणातून वैर वाढल्याने अन्सार रहीम शेख (वय अंदाजे 35) यांच्यावर 10 ते 12 हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला (Crime News) केला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अन्सार शेख हे रात्री सुमारास आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत (Ahilyanagar Crime) असताना, दोन वाहनांतून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी चारचाकी आणि दुचाकी वाहनांतून घटनास्थळी येत, अन्सार शेख यांना दोन्ही बाजूंनी घेरलं. कोयते, गज तसेच लाकडी दांडक्यांनी अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात अन्सार शेख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! LPG ते बँकिंगपर्यंत बदल, थेट परिणाम तुमच्या खिशावर
हल्लेखोरांचा प्राणघातक हल्ला
ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फुटेजमध्ये आरोपींनी अगदी नियोजनपूर्वक अन्सार शेख यांना ट्रॅप करत हल्ला केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हिडीओत दिसत असलेल्या हिंसक हल्ल्यामुळे समाजमाध्यमांवर संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
ब्रेकिंग : रमी खेळणाऱ्या कोकाटेंचा डाव फडणवीसांनी उधळलाच; दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषिमंत्री
जखमी अन्सार शेख यांच्या फिर्यादीनंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात अझिझ गुलाब सय्यद, अन्वर गुलाब सय्यद, गुलाब फकीर मोहम्मद सय्यद यांच्यासह 10 ते 15 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली (भारतीय दंड संहितेनुसार) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
या हल्ल्यामागील पार्श्वभूमी कोर्टात सुरू असलेल्या जुन्या वादात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेनंतर कामरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आलंय.