Ahilyanagar News : साकळाई योजना कधी पूर्ण होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी याबाबत आश्वासने दिली मात्र ती योजना काही पूर्ण झाली नाही. याबाबत कोणी उपोषण केले नाही. साकळाईसाठी आंदोलने झाली मात्र ते गोरगरिबानी केली जे तथाकथित नेते आहे त्यांच्याबाबत एकही पुरावा दाखवा की त्यांनी याबाबत उपोषण केले. या योजनेसाठी चार चार दिवस मंडप टाकून कोणी नेते बसले नाही अशा शब्दांत माजी खासदार सुजय विखे यांनी (Sujay Vikhe) खासदार निलेश लंके यांना सुनावलं.
साकळाई योजना पूर्ण करण्याचे भाग्य विखे कुटुंबियांना मिळणार होते. तसेच येत्या महिन्याभरात (Nilesh Lanke) प्रशासकीय मान्यता देत या योजनेचे भूमिपूजन केले जाईल. अकराशे कोटींचा आराखडा हा तयार आहे. येणाऱ्या पाच वर्षांत जिरायती व दुष्काळी भाग आहे त्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही अशी ग्वाही सुजय विखे यांनी दिली.
दिव्यांगांना आवश्यक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नगर शहरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार सुजय विखे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मंचावरून जोरदार भाषण करत राजकीय टोलेबाजी केली. तसेच यावेळी सुजय विखे यांनी विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. तसेच साकळाई योजनेवरून देखील आश्वासने देणाऱ्यांचे कान टोचले.
पक्षात येणाऱ्यांना विरोध नाही, पण संघर्ष..सत्यजित तांबेंच्या भाजपप्रवेशावर सुजय विखे स्पष्टच बोलले
इंडिया आघाडीच्या बैठकीत मी पाहिले की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना थेट पाठीमागील खुर्ची देण्यात आली. हा त्यांच्या स्वाभिमानाचा भाग होता. मात्र जे लोक चौथ्या व पाचव्या रांगेमध्ये जागा भेटली तीच लोक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दुसऱ्या रांगेत जागा मिळाली तेव्हा त्यांच्यावर टीका करत होते. शिंदे तरी दुसरी रांगेवर होते मात्र हे लोक अशा व्यक्तीच्या मागे पाचव्या रांगेत आहे जो कधी पंतप्रधान होऊ शकत नाही. यावरच यांचा इंडियाच्या आघाडीत (INDIA Alliance Meeting) असलेलं महत्व स्पष्ट होतं अशा शब्दात विखे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
साकळाई उपसा जलसिंचन योजना लवकर मार्गी लागावी यासाठी नगर दक्षिण भागातील शेतकरी प्रतीक्षेत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या की यावर अनेक भाषणे व आश्वासने देण्यात आली मात्र ही योजना काही केल्या पूर्ण झाली नाही. अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी, सिंचनाचा अभाव असलेल्या 32 गावांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी साकळाई उपसा जलसिंचन योजना करण्याचे ठरले. साधारण पंचवीस-तीस वर्षांपासून या योजनेसाठी लोकांचा लढा सुरू आहे.
या योजनेच्या नावावर मते घेत आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या परंतु अजूनही योजना झाली नाही. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी साकळाई योजना मार्गी लागण्याचा शब्द दिला होता. आत्ताही राज्यात महायुतीचे सरकार आहे. या योजनेचा पाठपुरावा करून नेत्यांनी साकळाईच्या सर्वेक्षणाचे आदेश काढले, सर्वेक्षण पूर्ण झाले. आता सुजय विखे यांनी यावर भाष्य केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात ही योजना पूर्ण होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
18 वर्षात त्यांनी फक्त 5 कोटी खर्च केले, सुजय विखेंचा नाव न घेता थोरातांवर निशाणा