Download App

Ahmednagar Accident : डिव्हायडरला धडकून बसचा भीषण अपघात; प्रवासी थेट काच फुटून बाहेर फेकले गेले

Ahmednagar Accident : अहमदनगर जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडतच आहे. यातच शिर्डीमध्ये एका खासगी बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. भरधाव वेगात असलेली ही बस थेट रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. धक्कादायक म्हणजे हा अपघात एवढा भयानक होता की, बस पोलला धडकताच ड्रायव्हर शेजारी बसलेले प्रवाशी थेट बसच्या काचा फुटून बाहेर फेकले गेले. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही आहे. मात्र या अपघाताचा व्हिडीओ CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ( Ahmednagar Accident Bus Hit to Divider Passenger thrown out by broken glass )

Box Office Collection: सनी पाजीच्या ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! तीन दिवसात केली एवढी कमाई

शिर्डी शहरातील साईआश्रम भक्तनिवासाजवळ नगर मनमाड महामार्गावर हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असल्याचे समजते आहे. एक खाजगी प्रवासी वाहतुक करणारी ही बस भरधाव वेगाने चालली होती. याचवेळी ही बस थेट रस्त्यावरील एका दुभाजकावर जाऊन धडकली.

राऊतांनी पवारांशी पंगा घेतलाच; तुम्ही नातीगोती जपायची अन् कार्यकर्त्यांनी डोकी फोडायची का?

दरम्यान बसची ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या काचा फुटून तिन प्रवासी थेट रस्त्यावर पडले. दरवाजाजवळ असलेले तर दोन प्रवासी थेट बसच्या दरवाजातून बाहेर फेकले गेले. या बसमधून 20 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समजते आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. मात्र, चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे सध्या शिर्डी येथे पर्यटकांची तसेच साईंचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यातच अनेकदा वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले आत नसल्याने देखील असे अपघात घडत असल्याचे समोर आले आहे.

Tags

follow us