Download App

Ahmednagar : जड वाहतुकीला शहरातून बंदी घाला…; राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेत दिला इशारा

Ahmednagar News : काही दिवसांपूर्वी वाहनाच्या धडकेत (Accident)एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली. यानंतर आता राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. अवजड वाहनांना शहरातून प्रवेश बंद करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला (Superintendent of Police Rakesh Ola)यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर(Abhishek Kalamkar) यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

Supriya Sule : मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती तिघाडी सरकारमध्ये आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल

अहमदनगर शहरात बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या जड वाहतुकीमुळे दोन दिवसांपूर्वी डीएसपी चौकामध्ये भर दिवसा झालेल्या अपघातामध्ये एका अकरावीच्या विद्यार्थ्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. शहराला लागून बायपास लिंक रोड असताना बायपास येथील काही निवडक पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अवजड वाहनांना शहरांमध्ये येण्यास प्रवेश दिला जातो.

ISRO मध्ये वादाचा अंक! माजी अध्यक्षांवर टीका? सोमनाथ यांच्याकडून आत्मचरित्राचं प्रकाशन रद्द

वाहतुकीला प्रवेश देणाऱ्यांवर कारवाई करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ऐनवेळी दिवाळी तोंडावर असताना शहरातून जड वाहनांना कुठल्याही प्रकारे प्रवेश देऊ नये अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नगर शहरात अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे अनेकदा अवजड वाहने शहरातून प्रवास करतात व याद्वारे अनेकदा अपघात देखील झाले आहे. या अपघातांमध्ये अनेकांना आपले जीव देखील गमवावे लागले आहे.

Tags

follow us