ISRO मध्ये वादाचा अंक! माजी अध्यक्षांवर टीका? सोमनाथ यांच्याकडून आत्मचरित्राचं प्रकाशन रद्द
ISRO Chief S. Somnath Autobiography : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे (ISRO) अध्यक्ष एस. सोमनाथ (S. Somnath) यांनी त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकार माजी अध्यक्ष के. सिवन यांच्याबाबत टिप्पणी केल्याने वाद निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, सोमनाथ यांनी हा दावा फेटाळून लावत आपण आत्मचरित्रात कुणावरही व्यक्तिशः टीका केलेली नाही, असे स्पष्टीकरण दिले. चांद्रयान 3 मोहिमेच्या (Chandrayaan 3) यशानंतर ए. सोमनाथ देशभरात चर्चेत आहेत. त्यांचे ‘निलावू कुडीचा सिंहगल’ हे मल्याळम भाषेतील पुस्तक पुढील आठवड्यात प्रकाशित होणार होते. मात्र, त्याआधीच वाद निर्माण झाला. या आत्मचरित्रात के. सिवन यांच्यावर टीका करण्यात आली आहे असा दावा अनेकांनी केली. त्यामुळे या पुस्तकावरून नवा वाद उभा राहिला होता.
ISRO Gaganyaan Mission : अखेर ‘गगनयाना’चे चाचणी उड्डाण यशस्वी; इस्त्रोच्या प्रयत्नांना यश
एस. सोमनाथ यांच्या इस्त्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याकरता के. सिवन यांनी हस्तक्षेप केला होता असा दावा या पुस्तकातून करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यावर स्पष्टीकरण देताना सोमनाथ म्हणाले, की प्रकाशनाआधीच पुस्तकाच्या प्रती कुणाला तरी देण्यात आल्या. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशन थांबविण्याचा निर्णय घेतला, असे सोमनाथ यांनी सांगितले.
या पुस्तकात मी कुणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही. एखाद्या संस्थेत पद मिळवायचं असेल तर अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. एकाच पदासाठी अनेक व्यक्ती पात्र असू शकतात हाच मुद्दा मी पुस्तकातून मांडला होता. चांद्रयान 2 मोहिम अयशस्वी झाल्याच्य घोषणेच्या संदर्भात स्पष्टता नव्हती, असा उल्लेख या पुस्तकात केल्याचे सोमनाथ यांनी सांगितले. यानंतर त्यांनी आपण आत्मचरित्र का लिहिलं. त्याचा उद्देश काय होता, हे देखील सांगितले. जीवनातील अनेक अडचणी आणि संकटे यांचा सामना करून जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आत्मचरित्र लिहिले, असे सोमनाथ यांनी स्पष्ट केले.
चांद्रयान मोहिम यशस्वी
दरम्यान, भारताचे चांद्रयान 3 मिशन 23 ऑगस्ट रोजी यशस्वी ठरले होते. या दिवशी चांद्रयानाने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. भारताची ही कामगिरी यशस्वी राहिली. पहिलाच देश म्हणून जगभरात नावलौकिक मिळाला. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी स्वतः पीएम मोदी बंगळुरूत आले होते. येथे त्यांनी इस्त्रोतील शास्त्रज्ञांशी संवाद साधला. त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. सॉफ्ट लँडिंग ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणाला शिवशक्ती पाँइंट असे नाव दिले. चर याआधी चांद्रयान 2 मिशन जेथे क्रॅश झाले होते त्या ठिकाणाला तिरंगा पॉइंट असे नाव दिले.
Aditya-L1 Mission बद्दल ISRO ची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी होणार लॉन्च