Download App

महादेवाच्या पिंडीवर धारदार वस्तूने ओरखडे ओढले; नगर शहरातील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल

Ahmednagar : नगर शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या कपिलेश्वर पुरातन शिव मंदिरातील महादेवाच्या पिंडीची समाजकंटकांकडून विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना घडताच आमदार संग्राम जगताप यांनी मंदिरात जाऊन विधिवत अभिषेक व महाआरती केली. त्यानंतर मंदिराचे विश्वस्त विशाल पवार, राहुल पवार व भाविकांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार अजूनही साडे तीन जिल्ह्यांचेच नेते, भाजपकडून हल्लाबोल

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, हिंदू धर्मामध्ये महादेवाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे भाविक वर्गामध्ये नाराजी पसरली असून ही घटना खेतजनक व दुःख देणारी आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच समाजकंटकांवर कारवाई केली असती तर अशा घटना घडल्या नसत्या.

Tiger 3: कतरिना अन् सलमानचे ‘लेके प्रभु का नाम’ धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

समाजकंटकांमुळे समाजासमाजात दरी निर्माण होत असते. नगर शहरात शांतता भंग करण्याचे काम काही समजकंटक करत असून पोलिसांनी जर तातडीने कारवाई न केल्यास पोलिसांविरोधात तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही जगताप यांनी दिला आहे.

शंभूराज देसाईंवरील आरोपांमुळे अंधारे कायद्याच्या कचाट्यात; आधी नोटीस आता पोलिसात तक्रार

तसेच विश्वस्त विशाल पवार म्हणाले, पुरातन मंदिर असलेल्या कपिलेश्वर मंदिरातील पिंडीवर ओरखडे ओढल्याचे दिसत असून हे ओरखडे धारदार वस्तूने केल्याचा प्रकार आहे. दूध टाकल्यावर हे ओरखडे चांगल्या प्रकारे लक्षात येतात. यात महादेवाच्या पिंडीची विटंबना झाली असून आज दिवसभर विधिवत पूजा सुरु आहे.

Earthquake Nepal: नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के, बिहारमध्येही हादरली जमीन

उद्या पिंडीला वज्रलेप लावण्याचे काम सुरु होणार आहे. हे काम 8 दिवस सुरु राहणार असून या काळात मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. दरम्यान, या काळात भाविक भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, समाजकंटकांकडून हा प्रकार घडवून आणण्यात आल्यानंतर तत्काळ मंदिराचे विश्वस्त पुजारी यांच्यासह अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, अभिजीत खोसे, प्रा. माणिक विधाते, नगरसेवक अविनाश घुले,नगरसेवक प्रकाश भागानगरे, मनेष साठे, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, सुमित कुलकर्णी, वैभव वाघ, संतोष लांडे आदीं कोतवाली पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.

Tags

follow us