Ahmednagar Crime : शिर्डीत स्पा सेंटरच्या नावाखालील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Crime ) शिर्डीत स्पा-सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने पर्दाफाश करत छापा टाकला. यात दोन परप्रांतीय तरुणींची सुटका केली. तर तेथील कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. Navratri 2023 : भक्तांसाठी खुशखबर…बुऱ्हाणनगरच्या देवीचे मंदिर भाविकांसाठी 21 तास दर्शनास खुले मात्र, स्पा-सेंटर चालक फरार […]

Ahmednagar News :

Ahmednagar News

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Crime ) शिर्डीत स्पा-सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने पर्दाफाश करत छापा टाकला. यात दोन परप्रांतीय तरुणींची सुटका केली. तर तेथील कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

Navratri 2023 : भक्तांसाठी खुशखबर…बुऱ्हाणनगरच्या देवीचे मंदिर भाविकांसाठी 21 तास दर्शनास खुले

मात्र, स्पा-सेंटर चालक फरार झाला आहे. दोघांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिर्डीत सुरू असलेल्या या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर कारवाई झाल्याने शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. याबाबत अधिक माहिती अशी मिटके यांना शिर्डी येथील नगर-मनमाड रोडचे बाजूस एका बंगल्यामध्ये रिलॅक्स स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे.

Priya Bapat: पहिल्यांदाच दिसला प्रिया बापटचा असा अवतार अन् चर्चा सुरु…

याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी अमोल भीमा भोसले (रा.श्रीरामनगर शिर्डी ता. राहाता) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून स्पा सेंटर चालक गणेश कानडे हा फरार झालेला आहे. आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, शिर्डी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे, हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस नाईक अशोक शिंदे, बाबा खेडकर, वंदना वाकचौरे, श्याम जाधव, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे, चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे.

Exit mobile version