Navratri 2023 : भक्तांसाठी खुशखबर…बुऱ्हाणनगरच्या देवीचे मंदिर भाविकांसाठी 21 तास दर्शनास खुले

Navratri 2023 :  भक्तांसाठी खुशखबर…बुऱ्हाणनगरच्या देवीचे मंदिर भाविकांसाठी 21 तास दर्शनास खुले

Navratri 2023 : शारदीय नवरात्र उत्सवाला (Navratri 2023 ) उद्या म्हणजेच रविवार (15 ऑक्टोबर) पासून सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने नगर शहरातील बुऱ्हाणनगर येथील प्रसिद्ध असे कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. यानिमित्ताने मंदिर व मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीच्या मंदिराची रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते आहे.

Priya Bapat: पहिल्यांदाच दिसला प्रिया बापटचा असा अवतार अन् चर्चा सुरु…

विशेष म्हणजे जिल्ह्यासह राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने यावर्षी नवरात्र उत्सवात प्रथमच भाविकांना दिवसातील 21 तास तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता येणार आहे. दर्शन रांगेतून देवीच्या दर्शनास बराच वेळ लागत असल्याने भाविकांचा वेळ वाचवा यासाठी यावर्षी पासून देवीच्या मुख दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था मंदिरात करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव तयारी अंतिम टप्यात आली आहे, अशी माहिती अंबिका तुळजाभवानी देवी मंदिराचे मुख्य पुजारी विजय भगत यांनी दिली.

‘मोदी साहेब, फडणवीसांना समज द्या, कार्यकर्ते अंगावर घालू नका’; जरांगे पाटलांची मागणी

नवरात्रोत्सवाची अधिक माहिती देताना पुजारी अभिषेक भगत म्हणाले, श्री क्षेत्र तुळजापूरच्या तुळजाभवानी, तुळजापूर देवीच्या पालखीचा मान बुऱ्हाणनगर येथील भगत कुटुंबियांच्या मंदिराला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री अंबिका तुळजाभवानी देवी मंदिरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. यावर्षीच्या नवरात्रौत्सवात 10 दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

रविवार रोजी सकाळी 7 वाजता मंदिरातील तुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा व आरती होईल. सकाळी 11 वाजता शोभायात्रा, ध्वजारोहणाने विधिवत घटस्थापना होणार आहे. तसेच मंगळवार दि. 24 रोजी विजयादशमी निमित्त पहाटे 4 वाजता देवीची महापूजा, घाटोत्पाथनाची पूजा, सायंकाळी 7 वाजता सार्वत्रिक सीमोल्लंघन असे असणार आहे. शनिवार दि.28 रोजी कोजागिरी पोर्णिमा निमित्त सकाळी 7 वाजता देवीची महापूजा, सायंकाळी 7 वाजता पलंगाचा छबिना व महाआरतीने नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube