Download App

Ahmednagar Crime : अवैध धंद्यांची तक्रार केली म्हणून राजकीय गुंडांकडून वकिलाला बेदम मारहाण

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Crime : अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था (Ahmednagar Crime) सध्या ढासळत चालली आहे. अवैध धंद्यांची तक्रार पोलिसांत केल्याच्या रागातून एका वकिलाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील केडगावात घडली. विशेष म्हणजे तक्रारदाराने 112 नंबरवर अवैध धंद्याची तक्रार केली व पोलिसांनी संबंधित गुंडाना तक्रारदाराचा नंबर दिला. काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या गुंडांनी मला रस्त्यात अडवून मारहाण केली असा आरोप ॲड.हर्षद चावला यांनी केला आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

जॅकलिननं ब्लॅक सूट घातला नाही म्हणून चिडला; सुकेशचा तुरुंगातील आणखी एक कारनामा उघड

याबाबत अधिक माहिती अशी, नगर शहरातील विधीतज्ञ हर्षद चावला हे केडगावमधून घरी जात होते. यावेळी अचानक काही गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे आले व त्यांनी मला धमकवण्यास सुरुवात केली. पोलिसांना फोन करून आमच्या धंद्यांची माहिती देतो,आमचे धंदे बंद करतो, असे म्हणत त्या गुंडांकडून मला मारहाण करण्यात आली. एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मला मारहाण झाली आहे असा आरोप चावला यांनी केली.

ऐकावे ते नवलच! पंगतीला जेवणात नळ्याचे मटण नव्हते, नवरदेवाने भर मांडवात मोडले लग्न

दरम्यान या हाणामारीमध्ये चावला गंभीर जखमी झाले आहेत. अधिक उपचारासाठी चावाला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडे न्याय मिळण्याची मागणी चावला यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अक्षरशः ढासळली आहे. खून, हल्ले, मारहाण अशा घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. पोलीस यंत्रणा किरकोळ केसेस सोडवण्यात व्यस्त असून अशा मोठ्या घटनांना रोखण्यात त्यांना अपयश येत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा मालिन होत आहे. यातच राजकीय आश्रय असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून कायदा व सुव्यववस्था पायदळी तुडवली जात आहे. मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे आक्रमक व ठोस पाऊल उचलले जात नसल्याने या घटनांमध्ये वाढ होत आहे.

Tags

follow us