ऐकावे ते नवलच! पंगतीला जेवणात नळ्याचे मटण नव्हते, नवरदेवाने भर मांडवात मोडले लग्न

ऐकावे ते नवलच! पंगतीला जेवणात नळ्याचे मटण नव्हते, नवरदेवाने भर मांडवात मोडले लग्न

हैदराबाद : लग्नातील जेवणात नळीचे मटण नसल्याच्या कारणावरुन नवरदेवाने चक्क लग्न (marriage) मोडल्याची घटना घडली आहे. तेलंगणातील (Telangana) निजामाबाद येथे हा प्रकार घडला आहे. लग्नाच्या जेवणात मांसाहार होता. पण त्या मटणात नळ्या नसल्याच्या कारणावरुन वधू पक्ष आणि वर पक्षात जोरात वादावादी झाली. याच वादावादीच्या रागात नवरदेवाने थेट लग्नच मोडले. (no nalli mutton in the wedding meal, the husband broke the marriage)

याबाबत अधिक माहिती अशी की, वधू तेलंगणातील निजामाबाद येथील होती. तर नवरदेव जगतियाल जिल्ह्याचा रहिवासी होता. नोव्हेंबर महिन्यात दोघांचाही साखपूडा पार पडला. दोन्ही पक्षांमध्ये भव्य लग्न लावून देण्याबाबत चर्चा झाली. वरपक्षाकडून जेवणात भरपेट मांसाहार असावा अशी मागणी झाली.

हुश्श..! फ्रान्समध्ये अडकलेल्या भारतीय प्रवाशांची सुटका; 4 दिवसांनंतर विमान मुंबईत

मुलीच्या कुटुंबीयांनीही मागणीप्रमाणे लग्नातील पाहुण्यांसाठी मटणाची व्यवस्था केली. त्यानंतर मुलाकडील मंडळी कौतुक करतील, ताव मारतील असे मुलीकडील मंडळींना वाटत होते. पण पाहुण्यांनी लग्नातील जेवणात तक्रारी काढायला सुरुवात केली.

पाहुण्यांच्या तक्रारीची दखल घेत नवरदेवाच्या घरच्यांचा संताप झाला. त्यांनी तक्रार वधूच्या कुटुंबीयांकडे नेली. प्रकरणाचे रुपांतर वादावादीत झाले. त्यानंतर हाणामारी झाली. प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र काही निष्पन्न झाले नाही.

Criminal Law Bills ला राष्ट्रपतींची मंजुरी; अमित शाह म्हणाले नव्या युगाची सुरूवात

मुलीच्या कुटुंबीयांनी नळीशिवाय मटण वाढून आमचा अपमान केला असा दावा मुलाच्या कुटुंबीयांनी करायला सुरुवात केली. यावर वधू पक्षाने सांगितले की, लग्नाच्या जेवणासाठी नळीच्या मटणाची कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे त्याची व्यवस्था झाली नाही. पोलिसांनी खूप समजावूनही मुलाच्या घरच्यांना मान्य न झाल्याने अखेरीस भर मांडवात लग्न मोडले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube