Ahmednagar Crime : चार खुनांचा आरोप असलेला सिरीअल किलर मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (58) याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. अकोले तालुक्यातील सुगाव येथे ही घटना घडली. अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानंतर जमावाने केलेल्या मारहाणीत हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं प्रकरणं काय?
रविवारी (10 डिसेंबर) सायंकाळी अण्णा वैद्य याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, अण्णा वैद्यने एकट्या मुलीला गाठत तिला आपल्याकडे बोलावले. मात्र घाबरुन तिने घराकडे धाव घेतली. त्यावेळी अण्णाने जबरदस्तीने घरात घुसून पीडित मुलीलला मारहाण केली. यानंतर संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण केली.
Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! पुढील 24 तासांत तापमान आणखी घटण्याचा अंदाज
याच मारहाणीत अण्णा वैद्य गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला संगमनेरमध्ये रूग्णालायात दाखल करण्यात आले. मात्र यावेळी त्याला डॉक्टारांनी मृत घोषित केले. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन या प्रकरणामध्ये देखील त्याच्यावर पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण यावेळी जमावाच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.
अण्णा वैद्य हा एक अट्टल गुन्हेगार होता. काही वर्षांपूर्वी त्याने एका विद्युत मोटरीची चोरी केल्यानंतर चार साखळी खुनांचे प्रकरण उजेडात आले. चार महिलांचे खून करुन मृतदेह शेतात पुरल्याचे आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप त्याच्यावर झाले होते. यातील पहिल्या प्रकरणात त्याला संगमनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले. दुसऱ्या प्रकरणातही संगमनेर न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले. तर तिसऱ्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा भोगली होती. चौथ्या प्रकरणात सुनावणी सुरु होती.